मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Washim: लग्नाला कुटुंबियांचा विरोध! अनेक वर्षांच्या प्रेमाचा करुण अंत, परिसरात हळहळ

Washim: लग्नाला कुटुंबियांचा विरोध! अनेक वर्षांच्या प्रेमाचा करुण अंत, परिसरात हळहळ

May 10, 2023, 11:01 PM IST

  • Washim news : प्रेमीयुगुलाने गळफास घेत आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात घडली आहे.

सांकेतिक छायाचित्र

Washim news : प्रेमीयुगुलाने गळफास घेत आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटनावाशिम जिल्ह्यातीलमालेगाव तालुक्यातघडली आहे.

  • Washim news : प्रेमीयुगुलाने गळफास घेत आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात घडली आहे.

प्रेमाला घरच्यांचा होत असलेल्या विरोधास कंटाळून प्रेमीयुगुलाने आपले जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात घडली आहे. येथे प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. जऊळका पोलीस ठाण्यांतर्गत उमदरी वनपरिक्षेत्रात ही घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रेमीयुगुलाचे मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

लक्ष्मी ठाकरे (वय २० वर्ष रा.कुत्तरडोह), महादेव लोखंडे (वय २३ वर्ष, रा कवरदरी) अशी मृत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मी आणि महादेव दोघेही वाशिममधील रहिवाशी असून त्यांचे मागील अनेक वर्षापासून एकमेकांवर प्रेम होते. मात्र, त्यांच्या प्रेमसंबंधाला दोघांच्या घरच्यांचा विरोध होता.

कुटूंबाच्या विरोधाला कंटाळून दोघांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपासून ते घरातून बेपत्ता होते. दोघेही पुण्याला पळून गेल्याची तक्रार त्यांच्या कुटूंबीयांकडून करण्यात आली होती. पोलीस दोघांचा शोध घेत असतानाच लक्ष्मी आणि महादेव यांचे मृतदेह बुधवारी पहाटेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील उमदरी वनपरिक्षेत्रातील जंगलात आढळून आले. दोघांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या