मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Washim news : नवरात्रोत्सवाची तयारी करताना ९ जणांचा विजेचा धक्का; एकाचा मृत्यू

Washim news : नवरात्रोत्सवाची तयारी करताना ९ जणांचा विजेचा धक्का; एकाचा मृत्यू

Oct 10, 2023, 11:36 PM IST

  • Washim news : मानोरा शहरातील एका मंदिराची साफ सफाई करताना ९ तरुणांना विजेचा धक्का बसला. यात एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

संपादित छायाचित्र

Washim news : मानोरा शहरातील एका मंदिराची साफ सफाई करताना ९ तरुणांना विजेचा धक्का बसला. यात एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

  • Washim news : मानोरा शहरातील एका मंदिराची साफ सफाई करताना ९ तरुणांना विजेचा धक्का बसला. यात एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक बनली आहे.

राज्यात आता नवरात्रोत्वासाच्या तयारीला वेग आला आहे. मात्र वाशिममधून एक दु:खद घटना समोर आली आहे. नवरोत्सवाची तयारी करताना ९ तरुणांना विजेचा शॉक लागल्याने ते जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एका तरुणाची प्रकृती गंभीर आहे. वाशिम जिल्ह्यातील  मानोरा शहरामध्ये ही दुर्घटना घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासन हलले! 'त्या' दोन पब्सना टाळे ठोकण्याचे आदेश

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

गोपाळ सरघड (वय २०) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर दीपक भोरकडे असं प्रकृती चिंताजनक असलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याला दिग्रसमधल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

मानोरा शहरातील जुन्या वस्तीत असलेल्या जय भोले दुर्गा देवी मंदिरात साफ सफाईचे काम सुरू आहे. यावेळी मंदिराच्या कळसाची स्वच्छता करण्यासाठी लोखंडी शिडी घेऊन जाताना शिडीचा विद्युत तारांना स्पर्श झाला, त्यामुळे न जणांचा शॉक लागला व त्यात गोपाळला जीव गमवावा लागला आहे.
 

७ जणांवर मानोरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर प्रकृती चिंताजनक असलेल्या तरुणाला दिग्रसला हलवण्यात आले आहे. 

गौरव पद्मगिरवार, राम पांडे, शाम पांडे, शीवम पद्मगीरवार, तन्मय सवंदळे, सचिन सुरजूसे आणि देवेंद्र सवंदळे अशी जखमी तरुणांची नावे आहे. या घटनेमुळे मानोरा शहरात हळहळ व्यक्त होत असुन मानोरा पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या