मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Washim Lightning: आंबे तोडायला शेतात गेले अन् अंगावर वीज कोसळली; एकाचा जागीच मृत्यू

Washim Lightning: आंबे तोडायला शेतात गेले अन् अंगावर वीज कोसळली; एकाचा जागीच मृत्यू

Jun 05, 2023, 04:53 PM IST

  • Washim Lightning: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अंगावर वीज कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

lightning strike

Washim Lightning: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अंगावर वीज कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

  • Washim Lightning: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अंगावर वीज कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Malegaon Lightning: राज्यात रविवारी अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. याच दरम्यान, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात बाप लेक आंबे तोडण्यासाठी शेतात गेले असता अचानक झाडावर वीज कोसळली. या दुर्घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, वडील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update : राज्यात तापमान वाढणार! पालघर, ठाणे, मुंबईसह 'या' जिल्ह्यात हीट वेव्ह; आयएमडीचा यलो अलर्ट

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

निवास कदम (वय, ३१) असे अंगावर वीज कोसळून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर, गोविंदा कदम (वय,७०) असे जखमी झालेल्या वडिलांचे नाव आहे. मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील आहे. निवास हा त्याचे वडील गोविंदा यांच्यासह शेतात आंबे तोडायला गेले होते. मात्र, त्यावेळी झाडावर वीज कोसळल्याने निवासचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, गोविंदा हे गंभीर जखमी झाले आहेत. घरातील तरुण मुलाचा अचानक मृत्यू झाल्याने कदम कुटुंबियांवर दुख:चे डोंगर कोसळले.

मान्सूनचे आगमन होण्यापूर्वीच राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावासाने झोडपून काढले आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आहे.राज्यात पुढचे दोन ते तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये 5 जून म्हणजे आज विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या