मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Washim News : ११ वर्षे देशसेवा.. कर्तव्यावर असतानाच वाशिमच्या सुपुत्राला लेहमध्ये वीरमरण; जिल्ह्यावर शोककळा

Washim News : ११ वर्षे देशसेवा.. कर्तव्यावर असतानाच वाशिमच्या सुपुत्राला लेहमध्ये वीरमरण; जिल्ह्यावर शोककळा

Sep 11, 2023, 06:37 PM IST

  • shirpur jawan martyred : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील जवानाला लेह लडाख येथे वीरमरण आले आहे. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत.

आकाश आढागळे

shirpur jawan martyred : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील जवानाला लेह लडाख येथे वीरमरण आले आहे. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत.

  • shirpur jawan martyred : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथील जवानाला लेह लडाख येथे वीरमरण आले आहे. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यंस्कार करण्यात येणार आहेत.

भारतीय लष्करात सामील होऊन देशसेवा करणाऱ्या महाराष्ट्राच्या सुपुत्राला लडाखमधील लेहमध्ये वीरमरण आलं आहे. आकाश आढागळे (वय ३१) असं शहीद जवानाचं नाव असून तो गेल्या ११  वर्षापासून भारतीय लष्कराची सेवा बजावत होता. आकाशचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील शिरपूर  आहे. त्याच्या मृत्युमुळे आढागळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

लेहमध्ये कर्तव्यावर असताना ८ सप्टेंबर २०२३ रोजी एका अपघातात आकाशाला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर सैन्यदलाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.

उपचारादरम्यान रविवारी (१० सप्टेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. आकाश यांच्या पश्चात पत्नी रुपाली आढागळे, ४ वर्षाची मुलगी तन्वी, आई व दोन भाऊ असा परिवार आहे.

शहीद आकाश यांचे मोठे भाऊ नितीन सीमा सुरक्षा दलात तर लहान भाऊ महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असताना कठोर परिश्रम घेत आकाश २०११ मध्ये इंडियन आर्मीत भरती झाले होते. 

११ वर्ष देशाची सेवा केल्यानंतर त्यांना वीरमरण आले. आकाश यांचं पार्थिव मंगळवारी (१२ सप्टेंबर) त्यांच्या मूळगावी शिरपूर येथे आणले जाणार आहे. तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या