मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Washim News : धक्कादायक! वाशिममध्ये शिक्षकाला मारहाण करून पेट्रोल ओतून पेटवलं; उपचारादरम्यान मृत्यू

Washim News : धक्कादायक! वाशिममध्ये शिक्षकाला मारहाण करून पेट्रोल ओतून पेटवलं; उपचारादरम्यान मृत्यू

Oct 09, 2023, 07:00 PM IST

  • washim teacher set on fire : गंभीररित्या भाजलेल्या शिक्षकाचा  उपचारादरम्यान  मृत्यू झाला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मालेगाव-बोरगाव रस्त्यावरील कोल्ही शिवारात हा प्रकार घडला.

संग्रहित छायाचित्र

washim teacher set on fire : गंभीररित्या भाजलेल्याशिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मालेगाव-बोरगाव रस्त्यावरील कोल्ही शिवारात हा प्रकार घडला.

  • washim teacher set on fire : गंभीररित्या भाजलेल्या शिक्षकाचा  उपचारादरम्यान  मृत्यू झाला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मालेगाव-बोरगाव रस्त्यावरील कोल्ही शिवारात हा प्रकार घडला.

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.येथे प्राथमिक शाळेतील शिक्षकाला अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल ओतून पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गंभीररित्या भाजलेल्या शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मालेगाव-बोरगाव रस्त्यावरील कोल्ही शिवारात हा प्रकार घडला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

दिलीप धोंडोजी सोनवणे असे मृत शिक्षकाचे नाव आहे. दिलीप धोंडोजी सोनवणे हे मालेगाव तालुक्यातील बोरगाव जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. कोल्ही शिवारात अज्ञात लोकांनी प्राथमिक शाळेच्या शिक्षकाला लोखंडी रॉडने डोक्यावर वार केले. त्यानंतर शिक्षकाच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवले. या हल्ल्यात दिलीप सोनवणे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. शिक्षकाच्या मृत्यूनंतर झेडपी शाळेच्या शिक्षकांच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. 

आज (सोमवार) बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत जात असताना शिक्षक दिलीप सोनवणे यांचा अज्ञात व्यक्तींनी रस्ता अडवला. मालेगाव-बोरगाव रोडवर कोल्ही शिवारात अज्ञात व्यक्तींनी दिलीप सोनवणे यांचा रस्ता अडवून त्यांच्या डोक्यावर रॉडने मारहाण केली. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतलं आणि पेटवून दिलं. त्यांना तत्काळ वाशिम येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी शिक्षक दिलीप सोनवणे यांना मृत घोषित केले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या