मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Washim Crime : बहिणीला नवरा नशेत करायचा मारहाण म्हणून भावोजीची दारू सोडवायला गेला अन् घडलं भलतंच

Washim Crime : बहिणीला नवरा नशेत करायचा मारहाण म्हणून भावोजीची दारू सोडवायला गेला अन् घडलं भलतंच

Nov 21, 2023, 11:41 PM IST

  • Washim Crime News : बहिणीच्या नवऱ्याची दारू सोडवायला घेऊन जाताना रस्त्यातच दोघांचा वाद झाला अन् भावाने बहिणीच्या दारुड्या नवऱ्याला संपवलं. ही घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालु्क्यात घडली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

Washim Crime News : बहिणीच्या नवऱ्याची दारू सोडवायला घेऊन जाताना रस्त्यातच दोघांचा वाद झाला अन् भावाने बहिणीच्या दारुड्या नवऱ्याला संपवलं. ही घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालु्क्यात घडली आहे.

  • Washim Crime News : बहिणीच्या नवऱ्याची दारू सोडवायला घेऊन जाताना रस्त्यातच दोघांचा वाद झाला अन् भावाने बहिणीच्या दारुड्या नवऱ्याला संपवलं. ही घटना वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालु्क्यात घडली आहे.

भावोजी दारू पिऊन बहिणीला सतत भांडायचा, मारहणा करायचा म्हणून त्यांचं व्यसन कायमचं सुटावं म्हणून मेव्हणा भावोजीला घेऊन दारू सोडवण्यासाठी जात होता. रस्त्याने जात असताना त्यांच्यात वाद झाला व भाऊजीने मेव्हण्यावर हल्ला केला. स्वत:चा बचाव करताना मेव्हण्याने जॅक आणि कोयत्याने वार केल्याने बहिणीच्या पतीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील अकोला-नांदेड महामार्गावरील झोडगा गावाजवळील एका बंद ढाब्यानजिक घडली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Boat sank in Bhima : वादळामुळे भीमा नदीत उजनी धरणात बोट उलटली; ६ जण बुडाले, एकाने पोहून वाचवले प्राण

Nashik News : इगतपुरीमध्ये धक्कादायक घटना, भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, ३ तरुणींचा समावेश

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

सुभाष मापारी (रा. बोरी मापारी) असे मृत भावोजीचे नाव असून आरोपी मेव्हण्याचे नाव नामदेव भुसारी असे आहे. तो वाशिम तालुक्यातील किनखेडचा रहिवाशी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार नामदेव भुसारी व त्याचा भावोजी सुभाष मापारी दोघे जण वाशिम बसस्थानकाजवळील दारुच्या दुकानाजवळ भेटले. त्यानंतर सुभाष यांचे दारूचे व्यसन सोडवण्यासाठी नामदेव त्यांना घेऊन मिनी ट्रकमधून मालेगावच्या दिशेने निघाला. नामदेव भुसारी वाहन चालवत होता. 

मालेगाव तालुक्यातील झोडगा गावाजवळ येताच सुभाष मापारी दारु सोडविण्याच्या कारणावरुन  नामदेवशी वाद घालू लागला. त्याने रागाच्या भरात नामदेववर कोयत्याने हातावर वार केला. स्वतःला वाचविण्यासाठी नामदेव भुसारी याने वाहनातील लोखंडी जॅक हातात घेवून सुभाष यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. तसेच त्यांच्या हातातील कोयता हिसकावुन त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करत त्यांना ठार केले. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला टाकून देत स्वतः मालेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या