मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha Theft : वर्ध्यात शेतकऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा! सोन्यासह ५५ पोतं सोयाबीन लंपास

Wardha Theft : वर्ध्यात शेतकऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा! सोन्यासह ५५ पोतं सोयाबीन लंपास

Dec 26, 2023, 09:38 AM IST

  • Wardha karanja Theft news : वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील नारा शिवारातील वाघोडा येथे एका शेतकऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यात सोने आणि सोयाबीन लुटण्यात आले. व शेतकऱ्यावर चाकूने वार करण्यात आला.

Wardha karanja crime news

Wardha karanja Theft news : वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील नारा शिवारातील वाघोडा येथे एका शेतकऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यात सोने आणि सोयाबीन लुटण्यात आले. व शेतकऱ्यावर चाकूने वार करण्यात आला.

  • Wardha karanja Theft news : वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील नारा शिवारातील वाघोडा येथे एका शेतकऱ्याच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. यात सोने आणि सोयाबीन लुटण्यात आले. व शेतकऱ्यावर चाकूने वार करण्यात आला.

Wardha Crime news updaet : वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील वाघोडा येथे सोमवारी थरारक घटना घडली. येथील नारा शिवार येथील फार्म हाऊसवर सात ते आठ दरोडेखोरांनी रात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडे खोरांनी शेतकऱ्यावर चाकूने वर करत फार्म हाऊस येथील सोने आणि तब्बल ५५ सोयाबीनची पोती लंपास केली.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Weather Update: मुंबई, ठाणे, पालघरमध्ये उष्णतेची लाट! हवामान विभागाने दिला 'हा' इशारा, राज्यात पावसाचा इशारा

Jayant patil : “लढाई संपलेली नाही, तर आता..’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

Mumbai-Pune Trains: मुंबई ते पुणे गाड्या रद्द, २८ मे ते २ जूनपर्यंत 'या' गाड्या धावणार नाहीत, वाचा संपूर्ण यादी

Mumbai Lok Sabha : वरळीत पोलिंग बूथवर काम करणाऱ्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Covid-19 JN1 ने चिंता वाढवली.. कर्नाटकात ३ मृत्यू, केरळ- महाराष्ट्रातही वेगाने फैलावतोय

कारंजा येथील वाघोड्यात नागपूर येथील गोपाल पालिवाल या शेतकऱ्याचे फार्म हाऊस आहे. तब्बल सात ते आठ दरोडेखोरांनी शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत दरोडा टाकला. ५५  पोते सोयाबीन, सोन्याचे दागिने लुटून फार्म हाऊसवरील प्रतिकार करणाऱ्या एकाच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकून गंभीर जखमी केले.

नागपूर येथील नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा येथील शेतात फार्महाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊस वर जात असत्तात. त्यांचे पीक व शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊस वर ठेवलेले असते. रविवारी देखील नारायण पालिवाल (वय ८०) त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल (वय ५०) व हरिकुमारी पालिवाल (वय ७०) हे सर्व जण त्यांच्या फार्म हाऊसवर गेले होते. मध्यरात्री तब्बल सात ते आठ दरोडे खोरांनी त्यांच्या या फार्म हाऊसवर दरोडा घातला.

Prakash Ambedkar: “…तर मोदी तुमच्या बोकांडी अन् तुम्ही तिहार जेलमध्ये”, प्रकाश आंबेडकरांचा INDIA आघाडीला टोला

दरोडेखोरांनी फार्म हाऊसचा दरवाजा ठोठावला, पालिवाल त्यांच्या मुलाने दरवाजा उघडताच पाच ते सहा जण चाकूचा धाक दाखवत आत घुसले. त्यांनी घरातील सर्वांना मारण्यास सुरुवात केली. यावेळी झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल यांच्या पोटात चाकू खुपसला. त्यांची त्याची आई हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील दागिने हिसकावले. तसेच ५५ पोते सोयाबीन लंपास केले. रविवारच्या मध्यरात्री हा सर्व थरार सुरू होता. पोटात चाकू भोसकल्याने गोपाल पालिवाल गंभीर जखमी झाले. दरोडेखोरांनी ऐवज लंपास करीत पळ काढला.

पळून जात असतांना दरोडे खोरांनी पालीवाल यांच्या गाडीतील हवा सोडली. त्यांचे मोबाईल सुद्धा हिसकावले. पण पालिवाल कुटुंबाने हवा सोडलेल्या वाहनानेच पोलीस ठाणे गाठले. त्यांनी त्यांच्यावर घडलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी या घटनेची दखल घेत, याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण यांना दिली. चव्हाण तातडीने घटनास्थळी पोहोचले. कारंजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनिल गाडे, ए एस आय निलेश मुंढे, मंगेश मिलके, किशोर कापडे यांनी नाकाबंदी करत दरोडे खोरांचा शोध घेण्यासाठी पथके पाठवले. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या