मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha news : संतापजनक.. मजुरीच्या पैशावरून पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारलं, नंतर जमिनीवर डोकं आपटून संपवलं

Wardha news : संतापजनक.. मजुरीच्या पैशावरून पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारलं, नंतर जमिनीवर डोकं आपटून संपवलं

Oct 15, 2023, 11:26 PM IST

  • husband murderd wife : वर्ध्यात पतीने पत्नीचे डोके जमिनीवर आपटून तिची हत्या केली. याप्रकरणामुळे खळबळ माजली आहे. 

husband murderd wife

husband murderd wife : वर्ध्यात पतीने पत्नीचे डोके जमिनीवर आपटून तिची हत्या केली. याप्रकरणामुळे खळबळ माजली आहे.

  • husband murderd wife : वर्ध्यात पतीने पत्नीचे डोके जमिनीवर आपटून तिची हत्या केली. याप्रकरणामुळे खळबळ माजली आहे. 

वर्धा : वर्ध्यातून एक खबळजनक घटना समोर आली आहे. मजुरीच्या पैशांच्या वादातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. वर्धा जिल्ह्यातील पुलगावमधील दखनी फैल परिसरात हा प्रकार घडला. मंगला राजेश राजगत्ता (वय ४५) असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर राजेशसिंह राजदत्ता (वय ५५) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. 
 

ट्रेंडिंग न्यूज

Pune Metro : मेट्रोने आणली भन्नाट योजना! केवळ शंभर रुपयांत करा पुणे दर्शन! असा घ्या लाभ

मुंबईत ३६ फ्लेमिंगोचा पक्ष्यांचा मृत्यू; आकाशात उडणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्याला विमान धडकले

Madhya railway : मध्य रेल्वेची वाहतूक तांत्रिक कारणाने विस्कळीत ! ठाणे, डोंबिवली स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी

Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेशसिंग राजदत्ता व पत्नी मंगला यांच्या मजुरीच्या पैशावरून वाद सुरू होता. याच वादातून राजेशने पत्नी मंगलला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि तिचं डोकं जमिनीवर आपटलं. यातच मंगलाचा मृत्यू झाला.याप्रकरणी पुलगाव पोलिस ठाण्यात तक्रार  दाखल करण्यात आली असून. पोलिसांनी राजेशसिंगला दखनी फैल परिसरातून अटक केली. 

गडचिरोलीमध्ये पत्नीकडून पतीची हत्या –

दुसरीकडे गडचिरोलीमध्ये अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरची तालुक्यात दवंडी येथे ही घटना घडली आहे. प्रकरणी पोलिसांनी पत्नी, तिचा प्रियकर व आणखी एकाला अटक केली आहे. दवंडीमध्ये लखन सोनार हे किराणा मालाचं दुकान चालवत होते. ११ ऑक्टोबरला मध्यरात्री गाढ झोपेत असताना घरात पाच जण तोंडाला काळा कपडा बांधून आले आणि त्यांनी धारदार शस्त्रांनी वार करून लखन यांची हत्या केली. यानंतर पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं आणि आपल्यासमोरच पतीची हत्या झाल्याची तक्रार दिली. तपास करत असताना सरितानेच मुख्य आरोपी सुभाषच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचं समोर आलं.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या