मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha Girl murder: वर्धा हादरले! तरुणीनं प्रेमाला नकार दिला म्हणून तिला घराबाहेर अंगणात बोलवून चिरला गळा

Wardha Girl murder: वर्धा हादरले! तरुणीनं प्रेमाला नकार दिला म्हणून तिला घराबाहेर अंगणात बोलवून चिरला गळा

Oct 03, 2023, 03:00 PM IST

  • Wardha selu Girl murder : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एकतर्फी प्रेमातून प्रियकराने तरुणीला घराबाहेर बोलावून अंगणातच तिचा गळा चाकूने चिरून तिची हत्या केली

crime news

Wardha selu Girl murder : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एकतर्फी प्रेमातून प्रियकराने तरुणीला घराबाहेर बोलावून अंगणातच तिचा गळा चाकूने चिरून तिची हत्या केली

  • Wardha selu Girl murder : वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एकतर्फी प्रेमातून प्रियकराने तरुणीला घराबाहेर बोलावून अंगणातच तिचा गळा चाकूने चिरून तिची हत्या केली

Wardha selu Girl murder : राज्यात एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर भर वस्तीत कोयत्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतांना आता वर्धा जिल्हा देखील अशाच एका घटनेने हादरला आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू येथील दहेगाव गोसावी येथे एका नराधम तरुणाने एकतर्फी प्रेमातून एका २३ वर्षीय तरुणीला घरा बाहेर बोलावून तिच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून केला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच गावात तनावाचे देखील वातावरण आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai Pune weather update : मुंबईत उकाड्याने तर, ऊन आणि पावसाच्या खेळानं पुणेकर हैराण

udaipur jaipur vande bharat : रुळांवर दगड आणि लोखंड ठेवले, वंदे भारत एक्सप्रेसला घातपात घडवण्याचा कट

मिळालेल्या माहितीनुसार वर्धा शहाराजवळील नालवाडी येथील दोघे तरुण हे सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे गेले. यावेळी या दोघांसोबत दोन मुली देखील होत्या. हे चौघे खून करण्यात आलेल्या मुलीच्या घरी गेले. दरम्यान, दोन मुलींनी खून करण्यात आलेल्या मुलीच्या घराच्या गेट जवळून तिला बाहेर येण्यास सांगितले. यावेळी तरुणी ही घराबाहेर तिच्या अंगणात आली. दरम्यान, दोन मुलींसोबत आलेले तरुण हे घराबाहेर लपून बसले होते. यावेळी त्यांनी अचानक तरुणीवर हल्ला करून तिच्यावर चाकूने सपासपवार केले. तर दुसऱ्याने तिचा गळा चिरला.

NCL Recruitment: एनसीएलमध्ये आयटीआय, दहावी उतीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची संधी; 'इतका' पगार मिळणार!

मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे घरातील व्यक्ति धावत पळत घराबाहेर आले. यावेळी दोघे तरुण फरार झाले. दरम्यान, मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला तातडीने सेवाग्राम येथील दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र, तिच्यावर उपचार सुरू असतांना जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

पाठलाग करून दोन्ही तरुणांना पकडले.

मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकताच घरचे तसेच आजूबाजूचे लोक बाहेर आहे. यावेळी दोघा हल्लेखोरांनी वार काढून पळ काढला. यावेळी आसपासच्या नागरिकांनी देखील हल्लेखोरांचा पाठलाग गेला. काही अंतरावर दोघांना पकडण्यात आले. नागरिकांनी त्यांना पोलिसाना स्वाधीन केले आहे. दरम्यान, या घटनेमुळे दहेगाव गोसावी येथे तणावाचे वातावरण आहे. दहेगाव ग्रामस्थांनी वर्धा येथील पोलीसठण्याबाहेर एकत्र येत हल्लेखोर तरूणांवर कारवाईची मागणी केली.

प्राध्यापिकेला मारले होते जाळून

वर्धा जिल्ह्यात या पूर्वी देखील एकतर्फी प्रेमातून एका प्राध्यापिकेला जीवंत जाळून मारण्यात आले होते. ही घटना हिंगणघाट येथे घडली होती. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली होती. दरम्यान, दहेगाव गोसावी येथील घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या