मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हिंदुत्व सोडल्याचा आरोप सेनेवर करणाऱ्या भाजपला धक्का; बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते बांधणार शिवबंधन

हिंदुत्व सोडल्याचा आरोप सेनेवर करणाऱ्या भाजपला धक्का; बजरंग दल, विहिंपचे कार्यकर्ते बांधणार शिवबंधन

Aug 29, 2022, 02:27 PM IST

    • Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वीच शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. त्यानंतर आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे असंख्य कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
Shiv Sena president Uddhav Thackeray (HT_PRINT)

Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वीच शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. त्यानंतर आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे असंख्य कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

    • Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वीच शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. त्यानंतर आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे असंख्य कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

VHP and Bajrang Dal Activist Join Shiv Sena : काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी युती करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेनेत इनकमिंग सुरू झालं आहे. कारण आज विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे असंख्य कार्यकर्ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers theft : पुण्यात वानवडीतील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० किलोचे दागिने लंपास

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यानं पक्षातील अनेक नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यामुळं शिवसेनेला मोठी गळती लागली होती. परंतु आता शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत युती करून नवीन राजकीय मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच आता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवबंधन हाती बांधणार आहे.

मराठवाड्यात शिवसेनेला मिळणार दिलासा...

शिंदे गटानं बंड केल्यानंतर मराठवाड्यातील अनेक आमदारांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यात हिंगोली जिल्ह्यातील आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आता हिंगोलीतील काही कॉंग्रेसचे कार्यकर्ते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि काही शेतकरी नेते उद्धव उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळं आता मराठवाड्यातून शिवसेनेत मोठी इनकमिंग होत असल्यानं शिवसेनेला दिलासा मिळाला आहे.

शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष वाढला...

शिवसेनेतील शिंदे गटानं राज्यात भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानं शिवसेना आणि शिंदे गटात सातत्यानं राजकीय संघर्ष होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अजूनही मुंबई महापालिकेकडून परवानगी देण्यात आलेली नाही. मुंबई महापालिकेत सध्या प्रशासक कारभार पाहत असून शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय आता शिंदे गटानं मुंबईत प्रति शिवसेना भवन उभारण्याची घोषणा केल्यानं शिवसेना आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांची फैरी होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुढील बातम्या