मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Nov 16, 2022, 12:04 PM IST

    • विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी रायगड जिल्ह्यात रसायनी पोलिसात चालक एकनाथ कदम यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. लवकरच कार चालक एकनाथ कदम यांना ताब्यात घेण्यात येणार आहे.
विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (PTI)

विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी रायगड जिल्ह्यात रसायनी पोलिसात चालक एकनाथ कदम यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. लवकरच कार चालक एकनाथ कदम यांना ताब्यात घेण्यात येणार आहे.

    • विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी रायगड जिल्ह्यात रसायनी पोलिसात चालक एकनाथ कदम यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. लवकरच कार चालक एकनाथ कदम यांना ताब्यात घेण्यात येणार आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा १४ ऑगस्ट रोजी अपघाती मृत्यू झाला होता. आता या मृत्यू प्रकऱणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. रायगड जिल्ह्यात रसायनी पोलिसात चालक एकनाथ कदम यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. लवकरच कार चालक एकनाथ कदम यांना ताब्यात घेण्यात येणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

विनायक मेटे यांच्या गाडीचा १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषम अपघात झाला होता. त्यांना मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी विनायक मेटे यांना मृत घोषित केलं होतं. त्यावेळी विनायक मेटे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं होतं.

राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनाही विनायक मेटे यांच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी करून निष्कर्ष सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. सीआयडीने विनायक मेटे यांची कार ज्या मार्गावरून गेली तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासले. 

आयआरबीच्या इंजिनिअर्स आणि टेक्निकल अभियांत्यांकडूनही यात कोणाची चूक दिसते याची माहिती घेतली होती. गाडीचा वेग १२० ते १४० किमी प्रतितास इतका असल्याचं आढळून आलं होतं. तसंच अपघाताच्या थोडा वेळ आधी चालकाने उजवीकडे वळून ओव्हरटेकचा प्रयत्न केला होता. तसंच ओव्हरटेक करणं शक्य नसल्याचं माहिती असूनही प्रयत्न केला आणि अपघात झाला.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या