मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maha Vikas Aaghadi Vajramuth Sabha : भाजपला राज्यातून नामशेष केल्याशिवाय राहणार नाही- उद्धव ठाकरे

Maha Vikas Aaghadi Vajramuth Sabha : भाजपला राज्यातून नामशेष केल्याशिवाय राहणार नाही- उद्धव ठाकरे

Apr 03, 2023, 12:12 PM IST

    • Maha Vikas Aaghadi Vajramuth Sabha Live : निवडून दिलं म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकत नाही, जनतेला बेफाम सत्तेवर वचक ठेवावाच लागेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Maha Vikas Aaghadi Sabha Chhatrapati Sambhaji Nagar Live Updates (HT)

Maha Vikas Aaghadi Vajramuth Sabha Live : निवडून दिलं म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकत नाही, जनतेला बेफाम सत्तेवर वचक ठेवावाच लागेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

    • Maha Vikas Aaghadi Vajramuth Sabha Live : निवडून दिलं म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकत नाही, जनतेला बेफाम सत्तेवर वचक ठेवावाच लागेल, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Maha Vikas Aaghadi Sabha Chhatrapati Sambhaji Nagar Live Updates : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीची राज्यातील पहिली संयुक्त सभा आज संभाजीनगरमध्ये होत आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मविआचे अनेक दिग्गज नेत्यांच्या हजेरीत ही सभा पार पडत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

  • अश्फाक उल्लाह खान देशासाठी फाशीवर गेला, अनेक धर्मातील लोकांनी देशासाठी प्राण अर्पण केलेत- उद्धव ठाकरे
  • काश्मिरमध्ये अतिरेक्यांना टिपणाऱ्या औरंगजेबला हालहाल करून मारण्यात आलं, देशासाठी शहीद झालेला औरंगजेब देशासाठी शहीद झालाय- उद्धव ठाकरे
  • आमचे विचार स्पष्ट आहेत, आमचं हिंदुत्व हे शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाहीये- उद्धव ठाकरे
  • बेशूद्ध होईपर्यंत गर्भवती महिलेची चौकशी करता, हे तुमचं हिंदुत्व?- उद्धव ठाकरे
  • तुम्ही मोदींना सोबत घ्या मी माझ्या वडिलांच्या नावानं मैदानात येतो- उद्धव ठाकरे
  • चिन्ह, पक्ष आणि माझे वडील चोरले आहेत, एकनाथ शिंदेंना बाप सुद्धा दुसऱ्याचा लागतो- ठाकरे
  • अकाली दल, शिवसेनेला भाजपनं वापरून घेतलं, आता त्यांना आपल्याला सत्तेवरून खाली खेचायचंय- उद्धव ठाकरे
  • शिवसेनेचा जन्म भाजपची पालखी वाहायला झालेला नाही- उद्धव ठाकरे
  • आज माझ्याकडे काहीच नाही, संकटाच्या काळात कोण मदतीला येतं?- उद्धव ठाकरे
  • तुम्ही ५० खोके घेतलेत पण शेतकऱ्यांना काय मिळणार आहे- उद्धव ठाकरे
  • जे काम मी घरात बसून केलं ते तुम्ही सूरत, गुवाहाटीला फिरूनही करू शकणार नाही- उद्धव ठाकरे
  • सत्ताधारी सगळं काही त्यांच्या मित्रांसाठी करतायंत, शेतकऱ्यांना मात्र दहा रुपयांचा चेक देऊन चेष्ठा केली जातेय- उद्धव ठाकरे
  • निवडून दिलं म्हणजे तुम्हाला वाटेल ते तुम्ही करू शकत नाही, जनतेला बेफाम सत्तेवर वचक ठेवावाच लागेल- उद्धव ठाकरे

  • दडपशाहीविरोधात इस्त्रायलमध्ये लोक रस्त्यावर उतरलेत, राष्ट्रपतींनी पंतप्रधांना झापलं, त्यानंतर त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला- उद्धव ठाकरे
  • सरदार वल्लभभाईंचे पुतळे बांधता, मग पाकव्याप्त काश्मिर ताब्यात घ्या- उद्धव ठाकरे
  • मला जमीन दाखवायला निघालात, तुम्ही महाराष्ट्राचे नाही आणि आम्हाला शिकवता?- उद्धव ठाकरे
  • देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेनं होतेय- उद्धव ठाकरे
  • भाजप नाही भ्रष्ट जन पार्टी- उद्धव ठाकरे
  • मेघालयातील सरकारवर आरोप केले आणि आता त्यांच्यासोबत सत्तेत बसलेत, अमित शहा तुम्ही आता संगमांचं काय चाटताय?- उद्धव ठाकरे
  • भाजपचा सोम्यागोम्या आमच्यावर आरोप करतो आणि आमचं कुणी काही बोललं तर खटले दाखल करता?- उद्धव ठाकरे
  • लालू-नितीश यांचं सरकार पाडून तुम्ही नितीश यांचं काय चाटलं- उद्धव ठाकरे
  • आम्ही सत्तेसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटले तर मोदी-शहा शिंदे गटाचं काय चाटतंय?- उद्धव ठाकरे
  • मविआचं सरकार ज्या पद्धतीनं पाडण्यात आलं, ती पद्धत तुम्हाला मंजूर आहे का?- उद्धव ठाकरे
  • शिवरायांचं नाव घेता आणि पाठिमागून वार करता?- उद्धव ठाकरे
  • पदव्या दाखवून तरुणांना नोकऱ्या मिळत नाही आणि पीएम मोदींची पदवी मागितली म्हणून २५ हजारांचा दंड होतोय- उद्धव ठाकरे
  • मी कॉंग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं असेल तर तुम्ही मुफ्ती मोहम्मद सईद सोबत काय करत होता- उद्धव ठाकरे
  • महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरूय- उद्धव ठाकरे
  • केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार असताना औरंगाबादचं नामांतर झालं नाही, मविआचं सरकार असताना नामांतराचा निर्णय झाला- उद्धव ठाकरे
  • यापूर्वी आलो तेव्हा मुख्यमंत्री होतो, आता नाही परंतु गर्दीचा दुष्काळ नाही- उद्धव ठाकरे
  • अभिमानानं, समाधानानं आणि आनंदानं संभाजीनगरमध्ये आलोय- उद्धव ठाकरे
  • अजित पवार यांचं भाषण संपलं, उद्धव ठाकरे बोलतायंत
  • पंजा, मशाल आणि घड्याळ एकाच हातात घेऊन विजयासाठी जीवाचं रान करू- अजित पवार
  • मविआची सभा होऊ नये, यासाठीच छत्रपती संभाजीनगरमध्ये राडे केले जातायंत, वातावरण खराब केलं जातंय- अजित पवार
  • धमक असेल तर सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा, निव्वळ राजकारण करण्यासाठी त्यांचं नाव वापरू नका- अजित पवार
  • कांदा, कापूस प्रश्नावर शिंदे-फडणवीस सरकार भूमिकाच घेत नाही- अजित पवार
  • शिंदे-फडणवीस सरकार हे शक्तिहीन आणि नपुंसक सरकार आहे, असं सुप्रीम कोर्ट म्हटलंय. जनाची नाही तर मनाची तरी बाळगा- अजित पवार
  • छत्रपती शिवाजी महाराजांसह अनेक महापुरुषांचा अपमान करणाऱ्या भगतसिंह कोश्यारींना शिंदे-फडणवीस सरकारनं का थांबवलं नाही- अजित पवार
  • मराठवाड्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारनं काहीच दिलेलं नाही- अजित पवार
  • सामान्यांचे मुख्यमंत्री सांगता अन् मराठवाड्यातील जनतेचा अपमान करता? - अजित पवार
  • मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनासाठी मुख्यमंत्र्यांनी केवळ १३ मिनिटं दिली, शिंदे-फडणवीस सरकारकडून मराठवाड्याची उपेक्षा- अजित पवार
  • राज्यातील मविआ सरकार पाडून बेकायदेशीर सरकार स्थापण्यात आलं- अजित पवार
  • भाजपकडून देशाच्या घटनेला तिलांजली देण्याचं काम सुरूय- अजित पवार
  • लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयासाठी जीवाचं रान करू- अजित पवार
  • देशावर संकट आलं की मराठवाड्यातील माणूस पेटून उठतो- अजित पवार
  • मविआचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी कार्यकर्त्यांना एकत्र आणण्याच्या सूचना ठाकरेनी केल्या होत्या- अजित पवार
  • अशोक चव्हाण यांचं भाषण संपलं, राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार बोलतायंत
  • विधान परिषद आणि कसब्यातील निवडणुकीत मविआचा विजय झाला, आता पुढेही भाजपचा पराभव करणार- अशोक चव्हाण
  • देशातील जनतेचे प्रश्न सोडून शिंदे-फडणवीस सरकार सावरकर गौरव यात्रा काढत आहे- अशोक चव्हाण
  • कोरोना काळात अनेक अडचणी असताना उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पद्धतीनं काम केलं, आम्हाला साथ दिली- अशोक चव्हाण
  • उद्धव ठाकरे मनाचे मोठे नेते, त्यांच्याएवढा भला माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही- अशोक चव्हाण
  • आगामी काळात लोकशाही टिकावायची की नाही, हा प्रश्न आता जनतेसमोर आहे- अशोक चव्हाण
  • अदानी प्रकरणावर भाजप उत्तर न देता फक्त गोंधळ घालतंय, राहुल गांधी आणि खर्गेंना बोलू दिलं जात नाहीये- अशोक चव्हाण
  • पक्ष फोडला, चिन्ह नेलं आणि भाजपसोबत घरोबा केला. भाजप देशातील विरोधकांना संपवायला निघालीय- अशोक चव्हाण
  • सर्व काही मिळूनही एकनाथ शिंदेंनी बंड केलं. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना काय कमी दिलं होतं?- अशोक चव्हाण
  • कितीही गौरव यात्रा काढल्या तर मराठवाड्यात त्याचा काहीही फरक पडणार नाही- अशोक चव्हाण
  • बाळासाहेब थोरात यांचं भाषण संपलं, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बोलतायंत
  • महाराष्ट्रात वारं बदलतंय, भाजपचा पराभव करणं शक्य, मविआ राज्यात १८० जागा जिंकणार- बाळासाहेब थोरात
  • अदानींच्या खात्यात २० हजार कोटी आले कुठून, या प्रश्नावर भाजप बोलायला तयार नाही, लोकप्रतिनिधींच्या खासदारक्या काढून घेतल्या जातायंत- थोरात
  • देशात सर्वात चांगल्या पद्धतीनं मविआच्या सरकारनं कोरोना स्थिती हाताळली, उद्धव ठाकरेंनी संयमी भूमिका घेतली- थोरात
  • मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात मविआ सरकारनं १० हजार कोटींची मदत केली- थोरात
  • कोरोना काळात निधी नसतानाही शेतकऱ्यांना ५० हजारांची तरतूद केली- बाळासाहेब थोरात
  • मविआच्या सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी घेतली. एक महिन्यात दोन लाखांचं कर्ज माफ झालं- बाळासाहेब थोरात
  • महाविकास आघाडीचं नाव राज्यातील जनतेच्या मनावर कोरलं गेलंय- बाळासाहेब थोरात
  • २०१९ साली उद्धव ठाकरेंच्या पुढाकारानंच मविआची सत्ता आली- बाळासाहेब थोरात
  • राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं भाषण संपलं, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात बोलतायंत.
  • आम्ही वज्रमुठ आवळली तर सरकारच्या पायाखालची माती सरकलीय- धनंजय मुंडे
  • दिवंगत शायर राहत इंदोरी यांचा शेर सांगत धनंजय मुंडे यांचा केंद्रातील मोदी सरकारवर घणाघात
  • मविआच्या यात्रेला घाबरून सावरकर गौरव यात्रा काढली जातेय, आमची जिथं सभा तिथंच मुख्यमंत्री सभा घेतायंत- धनंजय मुंडे
  • ज्या-ज्या वेळी दिल्लीश्वरांनी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं त्यावेळी मराठवाड्याच्या लोकांनी त्यांना मातीत गाडलंय-धनंजय मुंडे
  • शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातील मविआची सभा क्रांतीकारी ठरेल- धनंजय मुंडे
  • गेल्या दहा वर्षात भाजपकडून जनतेला केवळ मूर्ख बनवण्याचं काम सुरूय- धनंजय मुंडे
  • राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं भाषण सुरू
  • माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे हे संभाजीनगरच्या विमानतळावर दाखल झाले आहे. थोड्याच वेळात ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभेसाठी दाखल होणार आहेत.
  • विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे मंचावर दाखल झाले आहे.
  • संभाजीनगर येथील मराठवाडा मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेला महाविकास आघाडीच्या नेत्यांसह असंख्य कार्यकर्ते सभास्थळी जमा होत आहे.
  • संभाजीनगरच्या किराडपुरा भागात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मविआची ही सभा होत असल्यानं शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पुढील बातम्या