मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Uddhav Thackeray : सबका साथ आणि मित्र का विकास; अब की बार हद्दपार.., उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Uddhav Thackeray : सबका साथ आणि मित्र का विकास; अब की बार हद्दपार.., उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

Feb 10, 2024, 11:50 PM IST

  • Uddhav Thackeray On Modi : येत्या निवडणुकीत आपण शतक मारणार आहोत. यामुळे काहींना घाम फुटला आहे. ते ४०० पारचा नारा देत आहेत, मात्र आता अब की बार हद्दपार अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. 

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray On Modi : येत्या निवडणुकीत आपण शतक मारणार आहोत. यामुळे काहींना घाम फुटला आहे. ते ४०० पारचा नारा देत आहेत,मात्र आता अब की बार हद्दपारअशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

  • Uddhav Thackeray On Modi : येत्या निवडणुकीत आपण शतक मारणार आहोत. यामुळे काहींना घाम फुटला आहे. ते ४०० पारचा नारा देत आहेत, मात्र आता अब की बार हद्दपार अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला. 

उद्धव ठाकरे यांनी शनिवारी धारावीतील पक्षातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला.सबका साथ सबका विकास नाही तर 'सबका साथ मित्राचा विकास, असं सध्या सुरु आहे. मिठागरं आणि धारावी अदाणींच्या घशात घालण्याचा डाव पंतप्रधान मोदींचा असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

धारावीकरांना उचलून मिठागरात टाकायचं आणि धारावीत उपऱ्यांची वस्ती बसवून सगळा पैसा अदानीच्या खिशात घालण्याचा कट आहे. मात्र यात धारावीकरांनी काय पाप केलंय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. माझ्या धारावीकरांना हक्काचे घर मिळाले पाहिजे. ही आमची पहिली मागणी आहे. धारावीकर येथून कोठेही जाणार नाहीत. धारावीकरांना विकास पाहिजे आणि तो येथेच पाहिजे. तुम्हाला हे सोपे वाटत असेल की, घरे बांधेपर्यंत मिठागरात जागा दिली. पण एकदा का तुम्ही मिठागरात गेला की,परत तुम्हाला धारावी दिसणार नाही.

मी मुख्यमंत्री असताना माझ्या मुंबईकरांसाठी कांजूरमार्गची जागा मागत होतो. तेव्हा दिली नाही. पण आता पंतप्रधानांचे मित्र अदानीसाठी मुलुंडची, मिठागरांची जागा देऊन टाकली. कांजूरमार्गही मिठागराची जागा होती.

भाजपच्या आगामी लोकसभा निवडणुकीतील ४०० पार घोषणेवरून उद्धव यांनी जोरदार टोला लगावला. आपण शतक मारणार आहोत. यामुळे काहींना घाम फुटला आहे. ते ४०० पारचा नारा देत आहेत, मात्र आता अब की बार हद्दपारअशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला.

सत्ताधारी लोक अजूनही लोकांना प्रलोभने दाखवत आहेत. यांचे बाळासाहेबांचे विचार आता समोर येत आहेत. दिल्लीश्वराची लाचारी करण्यासाठी त्यांना निधी मिळाला आहे.

पुढील बातम्या