मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Korlai Bungalow Case : कोर्लई १९ बंगले प्रकरणात माजी सरपंचाला अटक, उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

Korlai Bungalow Case : कोर्लई १९ बंगले प्रकरणात माजी सरपंचाला अटक, उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

Apr 11, 2023, 12:19 AM IST

  • Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत पहिली अटक झाली आहे. कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत पहिली अटक झाली आहे. कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांनाअटक करण्यात आली आहे.

  • Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत पहिली अटक झाली आहे. कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे.

अलिबागमधील मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्या प्रकरणात फसवणूक केल्याबाबत पहिली अटक झाली आहे. कोर्लई ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास मिसाळ यांना रेवदंडा पोलिसांनी अटक केली.

ट्रेंडिंग न्यूज

महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस


कोर्लई प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांच्या नावे कोर्लई येथे जमीन आहे. या जागेत असलेल्या कथित बंगल्या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात तीन ग्रामसेवक, माजी सरपंच तसेच सदस्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी ग्रामसेवकांना नुकताच न्यायालयाने अटक पूर्व जामीन मंजूर केला होता. माजी सरपंच प्रशांत मिसाळ याचेही या प्रकरणात आरोपी म्हणून गुन्ह्यात नाव होते. त्यांना आज अटक करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण –

रश्मी ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांनी २०१४ साली अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई येथील जागा त्यावरील बांधकांमासह विकत घेतली होती. नाईक आता हयात नाहीत. या जागेवर १९ बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायत कार्यालयात होती. अन्वय नाईक या घरांची घरपट्टी भरत होते. हे बंगले ठाकरे–वायकर यांच्या नावे करावेत यासाठी पाठपूरावा देखील करण्यात आला. ही घरे ठाकरे – वायकर यांच्या नावे देखील झाली होती. त्यांची घरपट्टीही ते भरत होते.

 

नंतर मात्र हे प्रकरण अडचणीचे ठरू शकते लक्षात आल्यावर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दबाव टाकून २०२२ मध्ये कागदपत्रामंध्ये फेरफार करून बनावट कागदपत्रांच्या आधारे या घारांची नोंदणी रद्द करून घेतली, आणि बंगले जमिनदोस्त केलेअसा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या पाठपुराव्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढील बातम्या