मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje Bhosale: 'तर मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन' थेट माध्यमांसमोर उदयनराजें असे का म्हणाले?

Udayanraje Bhosale: 'तर मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन' थेट माध्यमांसमोर उदयनराजें असे का म्हणाले?

Mar 24, 2023, 02:19 PM IST

  • Udayanraje Bhosle: उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांनी केलेल्या भष्ट्राचाराच्या आरोपांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Udayanraje Bhosle

Udayanraje Bhosle: उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांनी केलेल्या भष्ट्राचाराच्या आरोपांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Udayanraje Bhosle: उदयनराजे यांनी शिवेंद्रराजे यांनी केलेल्या भष्ट्राचाराच्या आरोपांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Udayanraje Bhosle On Shivendra Raje Bhosale: खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरु आहे. हे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. दरम्यान, शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. याबाबत उदयनराजे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या शैलीत माध्यमांना उत्तर दिले आहे. “जर लोकांनी सांगितलं की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन”, असे त्यांनी शिवेंद्रराजेंना चॅलेंज दिले आहे. तसेच थेट समोर येऊन दाखवा असा इशाराच दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

शिवेंद्रराजे यांनी काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांचे नाव न घेता नगर विकास आघाडीने त्यांच्याच काळात मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. याबाबत पत्रकारांनी उदयनराजे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा की, आम्ही कुठे भ्रष्टाचार केला आहे आणि काय केले आहे, आम्ही मान्य करू. हा माईक लोकांमध्ये द्या आणि त्यांना सांगू द्या की, उदयनराजेंनी पैसे खाल्ले आहेत. तसे कोणी जर बोललं तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन आणि परत तोंड ताखवणार नाही", असे उदयनराजे यांनी म्हटले आहे.

पुढे शिवेंद्रराजे यांच्याबाबत बोलताना उदयनराजे म्हणाले की, “ज्यांच्या जीवावर यांनी संस्था स्थापन केल्या ते सर्वांना माहिती आहे. मला सांगताना लाज वाटते. बोलतानासुद्धा कमीपणा वाटतोय. बोलू की नको, असे झाले आहे. पण अजिंक्यतारा कुक्कुटपालन, अजिंक्यतारा बाजार समिती, बँका, महिला बँक आणि इतर अनेक संस्थांद्वारे यांनीच लोकांचे पैसे खाल्ले. दुर्दैवाने मला सांगावसं वाटते की, असे लोक एवढ्या मोठ्या घराण्यात जन्माला आले तरी कसे? आमच्या दारात कधी कोण आले नाही. आई-बहिणींवरून कोणी आम्हाला शिव्या दिल्या नाहीत", अशा शब्दात उदयनराजे यांनी शिवेंद्रराजेंना टोला लगावला आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या