मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजेंनी उधळून लावला आमदार शिवेंद्रराजे यांचा भूमिपूजन कार्यक्रम

Udayanraje Bhosale : खासदार उदयनराजेंनी उधळून लावला आमदार शिवेंद्रराजे यांचा भूमिपूजन कार्यक्रम

Jun 21, 2023, 11:48 AM IST

    • Udayan Raje Bhosale vs Shivendra Raje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
Udayan Raje Bhosale vs Shivendra Raje Bhosale (HT)

Udayan Raje Bhosale vs Shivendra Raje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

    • Udayan Raje Bhosale vs Shivendra Raje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

Udayan Raje Bhosale vs Shivendra Raje Bhosale : खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कारण शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा एक कार्यक्रम उदयनराजे भोसले यांनी उधळून लावल्याची माहिती समोर येत आहे. सातारा शहरातील खिंडवाडीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन इमारतीचे भूमीपूजन शिवेंद्रराजे यांच्या हस्ते होणार होतं. परंतु कार्यक्रमापूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांनी समर्थकांसह कार्यक्रमास्थळी हजेरी लावत कार्यक्रम उधळून लावला आहे. त्यामुळं आता भाजपातील दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. उदयनराजेंच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या साहित्यांची तोडफोड केली असून कंटेनर पलटी केल्याची माहिती आहे. कार्यक्रम उधळून लावण्यात आल्याने आमदार शिवेंद्रराजे यांनी कार्यक्रमस्थळी येणं टाळलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

Mumbai, Pune weather update : मुंबईत उष्णतेच्या लाटेने तर उन आणि पावसाने पुणेकर झाले हैराण!

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला ६० तास उलटूनही बचावकार्य सुरूच; मृतांचा आकडा वाढला

Maharashtra Weather Update: अवकाळी पाऊस काही थांबेना! रायगड, रत्नागिरी, नाशिकला वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आज सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या इमारतीचं उद्घाटन होणार होतं, परंतु अचानक कार्यक्रमस्थळी खासदार उदयनराजे यांनी समर्थकांसह हजेरी लावली. त्यानंतर उदयनराजेंच्या समर्थकांनी अचानक कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी करत तोडफोड करण्यास सुरुवात केली. कार्यक्रमस्थळी उदयनराजेंच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याची माहिती समजताच शिवेंद्रराजेंनी घटनास्थळी येणं टाळलं आहे. त्यामुळं आता सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उदयनराजे भोसले हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहे. तर शिवेंद्रराजे हे साताऱ्यातील जावळीतून विधानसभेचे आमदार आहे. दोन्ही नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते. त्यानंतर भाजपात प्रवेश केल्यानंतरही दोघांमधील राजकीय वैर काही कमी झालेलं नाही. भूमीपूजनाचा कार्यक्रमावरून दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळं आता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

पुढील बातम्या