मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Road Accident : भरधाव गाड्या एकमेकांवर आदळल्यानं दोघांचा मृत्यू; मुंबई-नाशिक हायवेवर विचित्र अपघात

Road Accident : भरधाव गाड्या एकमेकांवर आदळल्यानं दोघांचा मृत्यू; मुंबई-नाशिक हायवेवर विचित्र अपघात

Jan 02, 2023, 07:04 AM IST

    • Shahapur Accident VIRAL VIDEO : भरधाव वेगानं येत असलेल्या दोन वाहनांनी कारला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Mumbai Nashik Highway Accident (HT)

Shahapur Accident VIRAL VIDEO : भरधाव वेगानं येत असलेल्या दोन वाहनांनी कारला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

    • Shahapur Accident VIRAL VIDEO : भरधाव वेगानं येत असलेल्या दोन वाहनांनी कारला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Mumbai Nashik Highway Accident : गेल्या काही दिवसांपासून मुंबई-नाशिक महामार्गावर सातत्यानं अपघातांची मालिका सुरुच आहे. आज सकाळी शहापूरनजीक असलेल्या कुमार गार्डन हॉटेलजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईहून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्यामुळं स्थानिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यानंतर अनेक लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. याशिवाय इतर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

Mumbai Local Mega Block : रविवारी प्रवासाचे नियोजन करताय? लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Pradeep Sharma : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना आधी जन्मठेप अन् आता ‘सुप्रीम’ दिलासा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावर शहापुरजवळ भरधाव वेगानं येणाऱ्या कारनं रिक्षा आणि स्कूटी जोरदार धडक दिली. त्यामुळं तिन्ही वाहनं एकमेकांवर आदळल्यानं यात आठ जण जखणी झाले आहेत. याशिवाय शहापुरहून नाशिकच्या दिशेनं येत असलेल्या आश्विनी गोळे यांच्यासह आणखी एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अपघातानंतर तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला असून त्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातामुळं महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं आता अपघातग्रस्त वाहनांना रस्त्याच्या बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. याशिवाय या विचित्र अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबई-नाशिक महामार्गावरील गंगा देवस्थानजवळ अशाच प्रकारे तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाल्यामुळं दोन जण जखमी झाले होते. तेव्हापासून या महामार्गावर सातत्यानं कुठे ना कुठे अपघाताची मालिका सुरुच आहे. त्यामुळं पोलिसांनी महामार्गावर फलकही लावले होते. परंतु आता आज सकाळी पुन्हा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाल्यामुळं दोन महिलांचा जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं आता शहापूर परिसरात या घटनेमुळं हळहळ व्यक्त केली जात आहे.

पुढील बातम्या