मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Track Accident : समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग, चालकासह वाहकाचा होरपळून मृत्यू

Track Accident : समृद्धी महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग, चालकासह वाहकाचा होरपळून मृत्यू

Jun 20, 2023, 03:17 PM IST

    • Samruddhi Mahamarg Accident : कांद्याच्या गोण्या घेऊन जात असलेल्या अवजड वाहनात भीषण लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Track Accident On Samruddhi Mahamarg (HT)

Samruddhi Mahamarg Accident : कांद्याच्या गोण्या घेऊन जात असलेल्या अवजड वाहनात भीषण लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

    • Samruddhi Mahamarg Accident : कांद्याच्या गोण्या घेऊन जात असलेल्या अवजड वाहनात भीषण लागल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Track Accident On Samruddhi Mahamarg : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत आहे. नाशिक आणि बुलढाण्यातील अपघाताच्या घटना ताज्या असतानाच आता वाशिम जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कांद्यांच्या गोण्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकला भीषण आग लागली असून त्यात चालकासह वाहकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अचानक लागलेल्या आगीत ट्रक जळून खाक झाली आहे. तसेच त्यातील कांद्याचंही मोठं नुकसान झालं आहे. वाशिमच्या कारंजा नजीक हा अपघात झाला असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Car Accident : पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना पुणे पोलिस आयुक्तांचे खुले चॅलेंज! म्हणाले….

Latur News : कौटुंबिक कलहातून १४ वर्षांच्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल! क्लासच्या चवथ्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Khandala Accident: खंडाळा घाटात भीषण अपघात; कंटेनर- कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी

Viral Video : तरुणानं चक्क ८ वेळा मतदान केलं, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरून नागपुरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकला रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. सुरुवातीला हा प्रकार चालकाच्या लक्षात आला नाही. परंतु आगीने उग्र रुप धारण केल्यानंतर चालकाने ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला, परंतु तोपर्यंत आगीने केबिनचा ताबा घेतला. चालक आणि वाहकाला बाहेर पडता न आल्याने दोघांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. याशिवाय ट्रकमधील कांद्याचंही मोठं नुकसान झालं आहे. कारंजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी कारंजातील रुग्णालयात पाठवले आहे. चालकाची ओळख पटली असून वाहकाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवण्याचं काम जारी आहे.

समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहे. वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक ठिकाण अपघातांचे हॉटस्पॉट ठरत आहे. दररोज अपघात होत असल्याच्या घटना समोर येत असतानाच अज्ञात आरोपींनी लुटमारीच्या उद्देशाने खासगी बसवर तुफान दगडफेक केल्याचीही धक्कादायक घटना समोर आली होती. त्यामुळं आता समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षेसाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे.

पुढील बातम्या