मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांनी बुकी अनिल जयसिंघानीला दिलं होतं मदतीचं आश्वासन; पोलिसांच्या आरोपपत्रात दावा

Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांनी बुकी अनिल जयसिंघानीला दिलं होतं मदतीचं आश्वासन; पोलिसांच्या आरोपपत्रात दावा

Jun 06, 2023, 11:02 AM IST

  • Amruta Fadnavis assured bookie Anil Jaisinghani of help : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांनी बुकी अनिल जयसिंघानीला त्याच्यावरील गुन्हे खोटे असतील तर मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती पोलिसांच्या आरोप पत्रात पुढे आली आहे.

Anil Jaisinghani - Amruta Fadnavis

Amruta Fadnavis assured bookie Anil Jaisinghani of help : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांनी बुकी अनिल जयसिंघानीला त्याच्यावरील गुन्हे खोटे असतील तर मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती पोलिसांच्या आरोप पत्रात पुढे आली आहे.

  • Amruta Fadnavis assured bookie Anil Jaisinghani of help : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व गायिका अमृता फडणवीस यांनी बुकी अनिल जयसिंघानीला त्याच्यावरील गुन्हे खोटे असतील तर मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती पोलिसांच्या आरोप पत्रात पुढे आली आहे.

मुंबई : अनिल जयसिंघानीवरील गुन्हे जर खोटे असतील तर देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून मदत करेन असे आश्वासन अमृता फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती पोलिसांनी दाखल केलेल्या आरोप पत्रातून पुढे आली आहे. १८ मे रोजी सत्र न्यायालयात सादर केलेल्या दस्तऐवजात दावा करण्यात आला आहे की फडणवीस यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बुकीला लाचखोरी आणि ब्लॅकमेलच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Shivrajyabhishek Din 2023 : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर तुफान गर्दी, गडाचे दरवाजे केले बंद

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी बुकी अनिल जयसिंघानी यांना आश्वासन दिले होते की, जर त्यांच्या विरोधात नोंदवलेले गुन्हे खोटे असतील तर त्या देवेंद्र फडणीस यांच्याशी बोलून त्यांना मदत करण्याचा दावा त्यांनी केला होता, असे पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रात म्हटले आहे. जयसिंघानी याची मुलगी अनिक्षावर गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन दिवसांनी दोघांमध्ये हा संवाद झाला होता.

अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारी रोजी फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार दिली होती. त्यानुसार मलबार हिल पोलिसांनी गुन्हा दाखल करत बुकी अनिल जायसिंघानी, मुलगी अनिक्षा आणि त्याचा चुलत भाऊ निर्मल यांना लाच आणि ब्लॅकमेलच्या आरोपाखाली अटक केली होती. अमृता फडणवीस यांनी बुकी जयसिंघानी त्याची मुलगी अनिक्षासोबत केलेल्या व्हॉट्सअॅप चॅटचा समावेश असलेल्या ७३३ पानांचे आरोपपत्र १८ मे रोजी मुंबई पोलिसांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. २२ फेब्रुवारी रोजी झालेल्या दोघांच्या सांभाषणाबाबत आरोपपत्रात म्हटले आहे की, अमृता फडणवीस यांनी अनिल जयसिंघानीया आश्वासन दिले होते की, जर तुझ्यावरचे आरोप चुकीचे असतील तर मी देवेंद्रजींशी (फडणवीस) बोलून त्यांना न्याय देण्यास सांगू शकते, परंतु अनिक्षाच्या मागण्यांना मी बळी पडू शकत नाही. मला माहित आहे की मी काहीही चुकीचे केलेले नाही. मात्र, तुम्ही दोघांनी जाणीव पूर्वक मला ब्लॅकमेल केले.

weather update : राज्यात कुठे वादळी पाऊस तर कुठे उष्णतेची लाट; पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

“माझी बदनामी करण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ वापरण्यात आले. मात्र, सत्य कधी लपत नाही. जर तुम्ही खरोखर न्याय मिळवण्यासाठी हे करत असाल तर मी काय करायला हवे. मला सांगा की तुम्हाला माझ्याकडून नेमके काय हवे आहे,” असा सवाल देखील अमृता यांनी अनिलकडून याला विचारला आहे. आरोपपत्रात म्हटले आहे की, त्यानंतर अनिलने फडणवीस यांना अनेक ऑडिओ संदेश पाठवले.

आरोपपत्रानुसार, दुसर्‍या दिवशीही दोघांमध्ये अनेक मेसेजची पाठवण्यात आले. फडणवीस यांनी मदत करण्यास सहमती दर्शवली तरीही अनिक्षाने तिला ब्लॅकमेल केलेल्या व्हिडिओ दिलेले नाही.

"गुन्हे मागे घेतल्यावरी ब्लॅकमेल करणार नाही याची काय श्वास्वती आहे ? अनिक्षा ज्या प्रकारे बेटिंग रॅकेटच्या माहितीच्या माध्यमातून अवैध पैसे कमावण्याचा आग्रह धरत होती, त्याप्रमाणे तुमच्यावरील खटले मागे घेतल्यानंतर तुम्ही आणखी पैशांची मागणी करणार नाही याची खररी काय ?" असा सवाल देखील अमृता फडणवीस यांनी अनिल जयसिंघानीया यांना विचारला आहे.

Odisha Train Tragedy: ओडिशा रेल्वे अपघाततील ४० मृतदेहांवर एकही जखमा नाही; मृत्यूचे 'हे'कारण आलं पुढं

अनिलने दावा केला की अनिक्षाने तिला खटल्यातून बाहेर पडण्यासाठी जे योग्य वाटले ते केले, असे आरोपपत्रात म्हटले आहे. अनिक्षाने वडिलांना वाचवण्यासाठी कॉल आणि मीटिंग रेकॉर्ड केल्या होत्या. अमृता फडणवीस यांना हानी पोहोचवण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता. अनिलने असा दावाही केला की अनिक्षा सट्टेबाजीच्या रॅकेटबद्दल माहिती देऊ इच्छित होती, असे पोलिसांनी सांगितले.

त्याच संभाषणात, २३ फेब्रुवारी रोजी, अमृता फडणवीस यांनी अनिक्षाला त्याचे प्रकरण समजून घेण्यासाठी भेटण्याचे मान्य केले तसेच तिला आश्वासन दिले की ती अनिल यांना मदत करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलतील. परंतु पुणे पोटनिवडणुकी नंतरच बोलणार असे देखील त्या म्हणाल्या होत्या. एवढेच नाही तर अमृता फडणवीस यांनी २०१९ पासून त्यांचे आणि त्यांच्या पतीचे संबंध चांगले नसल्याकडे सांगत या प्रकरणानंतर ते घटस्फोट देईल अशी भीती वाटत होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

आरोपपत्रानुसार, तक्रार दाखल करण्याच्या एक दिवस आधी अमृता फडणवीस यांनी अनिक्षाला ब्लॉक केले होते, आणि दावा केला होता की अनिक्षाने गुप्तपणे सर्व मीटिंग रेकॉर्ड केल्या होत्या. त्यांच्यातील संभाषणांची देवाणघेवाण झाली. त्यानंतर अनिलने फडणवीस यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

अनिलने अमृता फडणवीस यांच्यावर अनिक्षाने एका टॉप म्युझिक आणि फिल्म प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयात पैसे घेतल्याचा आरोप केला, आरोपपत्रात म्हटले आहे की अनिक्षाने एका कर्मचाऱ्याला बॅगेत ९८ लाख रुपये दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

याशिवाय आरोपपत्रात म्हटले आहे की, अनिलने शिवरात्रीच्या दिवशी शिवसेनेचे तत्कालीन नेते एकनाथ शिंदे आणि अनिल परब यांच्यासाठी सापळा रचण्याची आणि महाविकास आघाडी सरकारचा पाडाव करण्याची रणनीती आखण्यासाठी देखील संपर्क साधला होता. अनिलने २३ फेब्रुवारीच्या संभाषणात दावा केला की, या बैठकीचे सर्व रेकॉर्डिंग त्याच्याकडे होते.

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, वडील आणि मुलीने त्यांना ब्लॅकमेल केले आणि त्यांच्याकडून १० कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. एक फॅशन डिझायनर म्हणून, अनिक्शाने नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांच्याशी मैत्री केली आणि नंतर तिने टीची आई नसून आणि संपूर्ण कुटुंब तिच्यावर अवलंबून आहे असे सांगून फडणवीस यांचा विश्वास संपादन केला, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Odisha Train Tragedy: इंटरलॉकिंग सिस्टममध्ये छेडछाडीमुळे ओडिशा रेल्वे दुर्घटना ? सीबीआय तपासाचे आदेश

एफआयआर नुसार, अनिक्शाने अमृता फडणवीस यांना तिच्या कंपनीचा लोगो लावण्याची विनंती केली. यास त्यांनी होकार दिला. अनिक्षाने उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीही भेट दिली आणि अमृता फडणवीस यांनी उपस्थित असलेल्या सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावली, असे तक्रारीत म्हटले आहे.

अनिक्षाने तिला क्रिकेट बुकींबद्दलची माहिती सांगण्याची ऑफर दिली आणि ते दोघेही त्यातून पैसे कमवू शकतात. जेव्हा तक्रारदाराने तिच्याशी संवाद साधणे थांबवले तेव्हा अनिक्शाने तिच्या वडिलांना सर्व आरोपांपासून मुक्त करण्याच्या बदल्यात १ कोटी रुपये देऊ केली, असे पोलिसांनी सांगितले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या