मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Bhide : संभाजी भिडे गोत्यात; तुषार गांधी यांनी केली पुणे पोलिसांत तक्रार

Sambhaji Bhide : संभाजी भिडे गोत्यात; तुषार गांधी यांनी केली पुणे पोलिसांत तक्रार

Aug 10, 2023, 04:18 PM IST

  • Tushar Gandhi vs Sambhaji bhide : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे चांगलेच गोत्यात आले आहेत.

Tushar gandhi files complaint against Sambhaji Bhide

Tushar Gandhi vs Sambhaji bhide : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे चांगलेच गोत्यात आले आहेत.

  • Tushar Gandhi vs Sambhaji bhide : महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे संभाजी भिडे चांगलेच गोत्यात आले आहेत.

Police Complaint against Sambhaji bhide : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य करून त्यांची बदनामी केल्याचा आरोप करत गांधीजींचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या विरोधात बदनामीची तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात ही तक्रार देण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

मागील महिन्यात अमरावती इथं झालेल्या कार्यक्रमात मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधी यांचे खरे वडील मुस्लिम जमीनदार आहेत. त्यांची आई घरातून पळून गेली होती, असं भिडे यांनी या कार्यक्रमात एका मुलाकडून वदवून घेतलं होतं. त्यावरून प्रचंड गदारोळ झाला होता.

भिडे यांच्या या वक्तव्यानंतर अमरावती व नाशिक जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी भिडे यांच्या अटकेची मागणी लावून धरली होती. मात्र, अद्याप त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळं आज तुषार गांधी यांनी भिडे यांच्या विरुद्ध राष्ट्रपित्याच्या बदनामीची तक्रार दाखल केली.

अॅड. असीम सरोदे यांच्या मार्फत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. व्यक्तिगत बदनामी, दोन समाजात शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न, भावना भडकवणारं वक्तव्य करणे या कलमांखाली भिडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी गांधी यांनी केली आहे.

भिडे यांनी महात्मा गांधी यांची बदनामी केली आहेच, शिवाय माझ्या कुटुंबाचाही अवमान केला आहे. गृहमंत्र्यांनी तपास करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात काही झालेलं नाही. त्यामुळं आम्हाला न्याय मागावा लागत आहे. त्यासाठीचं पहिलं पाऊल आम्ही आज उचललं आहे. पोलीस ही तक्रार गांभीर्यानं घेऊन पोलीस आपलं कर्तव्य बजावेल व संभाजी भिडे आणि त्याच्या संघटनेवर योग्य ती कारवाई करेल, असा विश्वास तुषार गांधी यांनी व्यक्त केला.

तुषार गांधी यांची तक्रार दाखल करून घेतली असून आम्ही त्यात लक्ष घालत आहोत, असं डेक्कन पोलिसांनी स्पष्ट केलं.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या