मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मोठी बातमी! तुळजाभवानीचे मौल्यवान अलंकार गहाळ… देवीचा मुकूट, मंगळसूत्र गायब

मोठी बातमी! तुळजाभवानीचे मौल्यवान अलंकार गहाळ… देवीचा मुकूट, मंगळसूत्र गायब

Dec 06, 2023, 08:42 PM IST

  • Tuljabhavani Ornaments Missing : तुळजाभवानीच्या २७ अलंकारांपैकी ४  अलंकार गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये सोन्याचा मुकूट, मंगळसूत्र आदि दागिन्यांचा समावेश आहे.

Tuljapur tuljabhavani

Tuljabhavani Ornaments Missing : तुळजाभवानीच्या२७अलंकारांपैकी ४अलंकार गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये सोन्याचा मुकूट, मंगळसूत्र आदि दागिन्यांचा समावेश आहे.

  • Tuljabhavani Ornaments Missing : तुळजाभवानीच्या २७ अलंकारांपैकी ४  अलंकार गायब असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये सोन्याचा मुकूट, मंगळसूत्र आदि दागिन्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दागिने गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंदिर संस्थानाने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या १६ सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात ही माहिती उघड झाली. मंदिरातील सोन्याचा मुकूट, मंगळसूत्र, नेत्रजोड आणि माणिक मोती आदि दागिने गहाळ झाल्याची माहिती चौकशी समितीच्या अहवालात समोर आली आहे. या प्रकारामुळे राज्यभरातील भाविकांत खळबळ माजली आहे. 
तुळजाभवानीच्या २७ अलंकारांपैकी ४ अलंकार गायब असल्याचे समोर आले आहे. यामध्ये  ८२६  ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट, ११ पुतळ्या असलेले मंगळसूत्र, नेत्रजोड  आणि माणिक मोती  असे मौल्यवान दागिने गायब आहेत. मंदिर संस्थानाकडून उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यांची समिती नेमली होती. या समितीच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

धक्कादायक म्हणजे चोरी लपवण्यासाठी पुरातन मुकूट चोरून त्याठिकाणी दुसरा मुकूट ठेवण्यात आला. पुरातन पादुका काढून नव्या बसवण्यात आल्यात. तुळजाभवानी मातेला अर्पण केलेल्या सोने-चांदीच्या शुद्धतेतही प्रचंड तफावत आढळून आलीय. सोन्यात ५० टक्के तूट आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे देवीला वाहण्यासाठी आणलेल्या  ४  तोळ्याचा सोन्याचा पादुका चक्क ताब्यांचं असल्याचं उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार मंदिर संस्थानच्या दागिने शुद्धता तपासणी मशीनमुळे उघडकीस आला आहे. 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या