मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या दानपेटीत ३४८ खड्यांचा २४ कॅरेट हिऱ्यांचा हार, ६५ कोटींच्या दागिन्यांचे मोजमाप

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानीच्या दानपेटीत ३४८ खड्यांचा २४ कॅरेट हिऱ्यांचा हार, ६५ कोटींच्या दागिन्यांचे मोजमाप

Jun 10, 2023, 07:56 PM IST

  • Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर दानपेटीत जवळपास ४ हजार किलो चांदी देवीला अर्पण झालेली आहे, त्याचे मोजमाप अद्याप बाकी नाही. देवस्थान समितीने नियुक्ती केलेली कर्मचाऱ्यांची टीम मोजमापाचे काम करत आहे.

Tulja Bhavani Temple

Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर दानपेटीत जवळपास४ हजार किलो चांदी देवीला अर्पण झालेली आहे,त्याचे मोजमाप अद्यापबाकीनाही. देवस्थान समितीने नियुक्ती केलेली कर्मचाऱ्यांची टीम मोजमापाचे काम करत आहे.

  • Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिर दानपेटीत जवळपास ४ हजार किलो चांदी देवीला अर्पण झालेली आहे, त्याचे मोजमाप अद्याप बाकी नाही. देवस्थान समितीने नियुक्ती केलेली कर्मचाऱ्यांची टीम मोजमापाचे काम करत आहे.

तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूची वितळवण्याची प्रक्रिया बुधवार (७ जून) पासून सुरु करण्यात आली आहे. देवीच्या सोन्या चांदीच्या मोजमापामध्ये आज (१० जून) चौथ्या दिवशी ३४८ हिरे आढळून आले. विशेष म्हणजे यामध्ये २४ कॅरेट हिऱ्यांचा हार सापडला आहे. आतापर्यंत दानपेटीतील २६ किलो सोन्याचे मोजमाप झाले असून याची बाजारभावातील किंमत ६५ कोटी रुपये इतकीआहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

गेल्या महिन्यात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एका भक्ताने कोट्यवधी रुपयांचे दान आल्याचे वृत्त ताजे असताना आता तुळजाभवानी मंदिरातील दानपेटीतील सोने-चांदीच्या दागिन्यांचे मोजमाप सुरू करण्यात आले आहे.आयकर विभागाने नियुक्त केलेले मूल्यांकन अधिकारी सिद्धेश्वर काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजाभवानी देवस्थान महाराष्ट्रातील अत्यंत श्रीमंत देवस्थानापैकी एक आहे. सोन्या-चांदीच्या वस्तू मोजमाप करण्याची प्रक्रिया आणखी महिनाभर सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. दानपेटीत जवळपास ४ हजार किलो चांदी देवीला अर्पण झालेली आहे, त्याचे मोजमाप अद्याप बाकी आहे. देवस्थान समितीने नियुक्ती केलेली कर्मचाऱ्यांची टीम मोजमापाचे काम करत आहे.

काळेयांनी सांगितले की, आपण आजपर्यंत ११०० देवस्थानाच्या संपत्तीचे मोजमाप केले आहे परंतु तुळजाभवानीचा हा सोन्या चांदीचा खजिना अलौकिक आहे. भाविक भक्तांची मोठी श्रद्धा देवीवर किती मोठ्या प्रमाणावर आहे याची साक्ष या अर्पण वस्तू वरून दिसून येते असेही ते याप्रसंगी म्हणाले.

 

आतापर्यंत २६ किलो सोन्याची मोजमाप प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ३४८ हिऱ्यांचे खडे २४ कॅरेट हिऱ्याचे मंगळसूत्र शनिवारी मोजमापामध्ये निदर्शनास आले आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या