मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Truck Accident : भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं, दोघांचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Pune Truck Accident : भरधाव ट्रकने दुचाकीला उडवलं, दोघांचा मृत्यू, पुण्यातील धक्कादायक घटना

Oct 21, 2023, 03:31 PM IST

    • Pune Truck Accident : पुणे जिल्ह्यातील एपी टर्मिनल जवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Pune Road Accident News Live Today (HT)

Pune Truck Accident : पुणे जिल्ह्यातील एपी टर्मिनल जवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    • Pune Truck Accident : पुणे जिल्ह्यातील एपी टर्मिनल जवळ भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune Road Accident News Live Today : समृद्धी महामार्गावरील अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला असून त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. एपी टर्मिनल जवळ झालेल्या या अपघातात अपघातग्रस्त दुचाकीचा चुराडा झाला आहे. त्यानंतर आता स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोरमध्ये भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली आहे. पुण्याहून लोणी काळभोरकडे येत असलेल्या दुचाकीला ट्रकने टक्कर दिल्याने त्यात गणेश हवालदार आणि त्याचा मित्र आदित्य साठे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर ट्रकचा चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोणी काळभोर परिसरात सातत्याने अपघात होत असल्याच्या घटना समोर येत आहे. काही दिवसांपूर्वीच लोणीतल्या मुख्य रस्त्यावर एका कारला भीषण अपघात झाला होता.

ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात मृत्यूमुखी पडलेला गणेश हवालदार हा पुण्यातील कोयता गँगचा प्रमुख असल्याची माहिती आहे. त्याचा मित्र आदित्य साठे याच्या मदतीने गणेशने पुण्यात अनेक लोकांवर जीवघेणे हल्ले केलेले आहे. पुणे पोलिसांत त्यांच्या नावावर अनेक गुन्हे दाखल आहे. मांजरी, हडपसर आणि शहरातील अनेक ठिकाणी झालेल्या कोयता गँगच्या हल्ल्यात गणेश हवालदारचा समावेश होता. पुणे पोलिसांनी त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई देखील केली होती. परंतु आता त्याचा अपघातात मृत्यू झाल्याने पुणे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पुढील बातम्या