मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Wardha Accident: खड्डा चुकवताना ट्रॅव्हल्स पलटली; भीषण अपघातात १ ठार तर ८ प्रवासी जखमी; वर्ध्यातील हिंगणघाट येथील घटना

Wardha Accident: खड्डा चुकवताना ट्रॅव्हल्स पलटली; भीषण अपघातात १ ठार तर ८ प्रवासी जखमी; वर्ध्यातील हिंगणघाट येथील घटना

Oct 05, 2023, 09:47 AM IST

    • Wardha Hinghanghat Accident: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नागपूर-हैदराबाद मार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स पलटून झालेल्या अपघात १ ठार तर ८ प्रवासी जखमी झाले आहे.
Wardha Hinghanghat Accident

Wardha Hinghanghat Accident: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नागपूर-हैदराबाद मार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स पलटून झालेल्या अपघात १ ठार तर ८ प्रवासी जखमी झाले आहे.

    • Wardha Hinghanghat Accident: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नागपूर-हैदराबाद मार्गावर भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स पलटून झालेल्या अपघात १ ठार तर ८ प्रवासी जखमी झाले आहे.

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नागपूर-हैदराबाद महामार्गावर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रॅव्हल्स पलटली असून यात १ प्रवासी ठार तर ८ जण जखमी झाले आहे. ही घटना छोट्या आर्वी शिवारातील सगुणा कंपनीजवळ आज पहाटे ५ च्या सुयमरास घडली. अपघातात मृत्यूमुखी पडलेलल्या तसेच जखमी नागरिकांचे नावे समजू शकली नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Viral Video : तरुणानं चक्क ८ वेळा मतदान केलं, व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Pune Porsche accident: पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी पोलीस ॲक्शनमोडमध्ये, पब, बार मालकासह आणखी तिघांना अटक

Pune Car accident: पप्पांनीच मला गाडी दिली, मी दारूही पितो! पोरशे कार अपघातातील आरोपी मुलांची धक्कादायक कबुली

HSC Result 2024 Live : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीच मारली बाजी!

Pune Fire news : पुण्यात अग्नितांडव! सर्व्हिस स्टेशनला लागलेल्या आगीत २५ ते ३० दुचाकी भस्मसात

मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथून एक खासगी ट्रॅव्हल्स बस ही नागपूर हैद्राबाद मार्गाने जात होती. ही ट्रॅव्हल्स (क्रमांक सी बी १९ एफ ३३६६) ही हैद्राबाद येथून रायपूरला जात होती. यावेळी बसमध्ये तब्बल २८ प्रवासी प्रवास करत होते. ही बस भरधाव वेगात जात असतांना ही हिंगणघाट जवळील छोटी आर्वी येथे आली.

Maharashtra weather update: राज्यातून मॉन्सून माघारी फिरणार; कोकण गोवा वगळता इतर जिल्ह्यात कोरडे हवामान

या ठिकाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात असलेल्या खड्डयांचा अंदाज बस चालकाला आला नाही. यामुळे मार्गात अचानक आलेला खड्डा चुकवण्याच्या नादात चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅव्हल्स पलटी झाली. या भीषण अपघातात ट्रॅव्हल्सचे नुकसान झाले. यात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर आठ प्रवासी हे गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती समजतात स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी जखमी नागरिकांना तातडीने बस मधून बाहेर काढले. यातील गंभीर जखमी रुग्णांना जवळील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. तर ज्यांना किरकोळ दुखापत झाली आहे, त्यांनी दुसरी बस पकडून पुढच्या प्रवासाला निघून गेले. ही बाब पोलिसांना समजल्यावर पोलिस देखील घटनास्थळी आले आहे. यावेळी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त बस क्रेनच्या साह्याने बाजूला करत येथील वाहतूक सुरुळीत केली. पुढील तापस हिंगणघाट पोलीस करत आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या