मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Alandi Traffice Change : आळंदीत उद्यापासून अवजड वाहनांवर बंदी, बदललेले मार्ग कोणते?

Alandi Traffice Change : आळंदीत उद्यापासून अवजड वाहनांवर बंदी, बदललेले मार्ग कोणते?

Jun 06, 2023, 02:30 PM IST

    • Alandi Traffice Change : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वाहतुकीत मोठा बदल केला आहे.
Alandi Traffice News Updates (HT)

Alandi Traffice Change : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वाहतुकीत मोठा बदल केला आहे.

    • Alandi Traffice Change : पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वाहतुकीत मोठा बदल केला आहे.

Alandi Traffice News Updates : पुण्यातील आळंदीत उद्यापासून चारचाकी तसेच अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. ७ ते १२ जून पर्यंत आळंदीतील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पालखी सोहळ्याच्या काळात आळंदीत वाहतूक कोंडी होऊ नये तसेच वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी आळंदीतील वाहतुकीत बदल केला आहे. चारचाकी तसेच अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहे. फक्त अत्यावश्यक सुविधा पुरविणारी आणि दिंडीतील लोकांना घेऊन जाणारी वाहनं आळंदीत सोडली जाणार असल्याचं वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Local Train news : ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली

Akola Crime : अकोल्यात आरोपीला गंभीर मारहाण! पार्श्वभागात दांडा टाकला, आरोपीचा कोठडीतच मृत्यू; पाच जणांची बदली

Beed Murder : बीड हादरले! कौटुंबिक वादातून उशीने तोंड दाबून पत्नीला संपवले, नंतर स्वत:ही केली आत्महत्या

Baramati Crime : धक्कादायक! बारामतीत जोडप्याला लुटून नग्न केले; नको त्या अवस्थेत फोटो काढले

येत्या ११ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपुरच्या दिशेने रवाना होणार आहे. यासाठी राज्यभरातून वारकरी मोठ्या संख्येने पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहे. पालखी सोहळा सुरू असताना आळंदीत मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळं वाहतूक पोलिसांनी आळंदीतील मार्गांवर चारचाकी तसेच अवजड वाहनांवर बंदी घातली आहे. अवजड वाहनं आळंदीपासून सहा ते सात किमी अंतरावर थांबवून त्यांना अन्य मार्गावरून वळवण्यात येणार आहे. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या औद्योगिक भागातून येणारी वाहनांनाही बदललेल्या मार्गांबाबत सूचना देण्यात आल्या आहे. आळंदीत वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

आळंदीतील वाहतुकीसाठी बदललेले मार्ग कोणते?

पुण्याहून आळंदीत येणारी अवजड वाहनं मॅक्झिन चौकातून भोसरीमार्गे वळवण्यात आली आहे. तसेच मोशी देहू फाट्यामार्गे आळंदीत येणारी वाहनं हवालदार वस्तीवरून दुसरीकडे वळवण्यात येणार आहे. चाकणमार्गे येणारी वाहतूक आळंदी फाट्यावर अडवण्यात आली आहे. वडगाव-पिंपळगावमार्गे येणारी वाहतूक कोयाळी फाट्यावर अडवण्यात येईल. मरकळहून येणारी वाहनांना धानोरे फाट्यामार्गे चऱ्होली बायपासवरून पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. त्याचबरोबर केळगावमार्गे येणाऱ्या वाहनांना चिंबळी फाट्यावर अडवण्यात येणार असल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलं आहे.

पुढील बातम्या