मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Toll Protest : 'रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न सुटतच नसेल तर टोल घेता कशाला?'

Toll Protest : 'रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न सुटतच नसेल तर टोल घेता कशाला?'

Oct 09, 2023, 06:03 PM IST

  • Congress on Toll Tax : मनसेनं टोल विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर काँग्रेसनंही राज्यातील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Toll Naka

Congress on Toll Tax : मनसेनं टोल विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर काँग्रेसनंही राज्यातील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

  • Congress on Toll Tax : मनसेनं टोल विरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर काँग्रेसनंही राज्यातील सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

Balasaheb on Toll Tax : महाराष्ट्रातील रस्त्यांची खराब परिस्थिती व टोल वसुलीच्या मुद्द्यावर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली असताना आता काँग्रेसनंही यात उडी घेतली आहे. रस्त्यावरचा प्रत्येक खड्डा शिंदे-फडणवीस सरकारच्या नाकर्तेपणाची साक्ष देतो. खड्ड्यांचा प्रश्न सुटणारच नसेल तर टोल कशाचा घेता, असा प्रश्न काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Konkankanya express : कोकणात जाणाऱ्या गाड्यांमध्ये तुफान गर्दी; ‘कोकणकन्ये’तून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील टोल दरवाढीला तीव्र विरोध दर्शवला. टोल हा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा आहे. टोलवाल्यांकडून सरकारला पैसे मिळतात. यापुढं छोट्या वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाके जाळून टाकू, असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही ही संधी साधत राज्यातील सरकारवर तोफ डागली आहे. नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. 'नाशिक मुंबई महामार्गाची परिस्थिती वाईट आहे. अडीच तासांच्या प्रवासाला चार ते साडेचार तास लागतात. एका एका जागेवर तासभर प्रतीक्षा करावी लागते. भिवंडीमध्ये तर रस्ता आणि खड्डे यातला फरकच कळत नाही. या खड्यांबद्दल कुणी चकार शब्द काढायला तयार नाही, टोलची वसुली मात्र बिनबोभाट सुरू आहे. हीच परिस्थिती राज्यातील सगळ्या महामार्गांची झालेली आहे. जनमानसात असंतोष वाढत आहे. अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा सरकारनं कार्यवाहीचं आश्वासन दिलं होतं. पण वाहतूक कोंडीत सुधारणा होण्याऐवजी वाढ झालेली आहे, याकडं थोरात यांनी लक्ष वेधलं.

टोलप्रश्नी काँग्रेस जनतेसोबत

राज ठाकरे यांनी दिलेल्या इशाऱ्याबद्दल विचारलं असता थोरात म्हणाले, टोलच्या संदर्भात राज ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र जनतेमध्ये प्रचंड उद्रेक आहे आणि काँग्रेस जनतेच्या या उद्रेकासोबत आहे. रस्त्यावरच्या खड्ड्या बाबतीत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. मुंबईला जाण्यासाठी अनेक जण रेल्वेचा पर्याय अवलंबतात. सत्ताधारी अनेक आमदारांना माझी विनंती आहे की एकदा रेल्वे ऐवजी गाडीनं या रस्त्यावरून प्रवास करून बघा, म्हणजे तुम्हालाही इतरांच्या वेदना कळतील.'

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या