मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Panvel water issue : पनवेलकरांनो पाणी जपून वापरा ! पुढचे ४८ तास पाणी पुरवठा राहणार बंद

Panvel water issue : पनवेलकरांनो पाणी जपून वापरा ! पुढचे ४८ तास पाणी पुरवठा राहणार बंद

Apr 10, 2023, 08:12 AM IST

    • Panvel Water Supply News : मुंबई महापालिका पाणीपुरवठा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पनवेलमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
Water Issue

Panvel Water Supply News : मुंबई महापालिका पाणीपुरवठा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पनवेलमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

    • Panvel Water Supply News : मुंबई महापालिका पाणीपुरवठा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने पनवेलमध्ये आज आणि उद्या पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.

पनवेल : पनवेल येथे मुंबई महापालिका पाणीपुरवठा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने सोमवारी आणि उद्या मंगळवारी शहरातील पानी पुरवठा हा बंद राहणार आहे, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगर पालिकेने केले आहे. आधीच विस्कळीत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त असताना पुन्हा दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जुन्या झालेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. यामुळे शहरातील पाणी पुरवठा हा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत आहे. दरम्यान, या जाळवाहिनीची काही महत्त्वपूर्ण कामे प्राधिकरणाने पुन्हा हाती घेतली आहे. यामुळे पुढील दोन दिवस शहरातील पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. नवी मुंबईतही पाण्याचा तुटवडा भासणार आहे.

उन्हाळ्यात देहरंग धरणाचे पाणी संपल्यानंतर तीन ते चार महिने पनवेल महापालिकेला शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. नागरिकांना रोज पाणी मिळावे, या साठी पनवेल महापालिका प्राधिकरणाच्या वाहिनीवरून नवी जोडणी घेऊन ८ ते १० एमएलडी पाणी घेणार आहे. पाण्याअभावी होणारी गैरसोय बघता नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जल अभियंता विलास चव्हाण यांनी केले आहे.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या