मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rain Alert: अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शुक्रवारीही ठाणे, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातल्या शाळा राहणार बंद

Rain Alert: अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शुक्रवारीही ठाणे, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यातल्या शाळा राहणार बंद

Jul 20, 2023, 10:53 PM IST

  • Maharashtra weather update : शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

Thane Rain

Maharashtra weather update : शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

  • Maharashtra weather update : शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

ठाणे – गेल्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे.  उद्या म्हणजेच शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे ठाणे जिल्ह्यातील १२ वी पर्यंतच्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शुक्रवारी २१ जुलै रोजी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयं बंद राहतील, असे आदेश दिले आहेत. मुसळधार पावसामुळे गुरुवारीही मुंबई आणि ठाण्यातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांनाही उद्या  (शुकवार) २१ जुलैला प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

हवामान विभागाकडून पालघर, ठाणे,  मुंबई, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून अनेक ठिकाणी मुसळधार पडण्याची शक्यता आहे.

मुंबईतील शाळांना आज (गुरुवार) सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्याचबरोबर शुक्रवारीही जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत

सिंधुदुर्गातही शाळा सलग दुसऱ्या दिवशी राहणार बंद -

कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस पडत असून नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळांना उद्या शुकवारी २१ जुलैला शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २० ते २३ जुलैपर्यंत पावसाचा येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी तत्काळ सुट्टीचे परिपत्रक जारी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना शुक्रवारी २१ जुलै रोजी सुट्टी मिळणार आहे.

पालघरमधील शाळांनाही शुक्रवारी सुट्टी जाहीर -

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक उद्या २१ जुलै रोजी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सुट्टी जाहीर केली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सर्व सरकारी व खाजगी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका व महानगरपालिका शाळा अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, निवासी आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे.

 

पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील शाळांना सुट्टी -

पुणेजिल्ह्याच्या घाट भागात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा दंडाधिकारी आणि पुणे जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी त्या भागातील शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या