मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Gangrape: संतापजनक! ठाण्यात अल्पवयीन मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार

Thane Gangrape: संतापजनक! ठाण्यात अल्पवयीन मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार

Oct 20, 2023, 02:51 PM IST

    • Minor Girl Gangrapes In Thane: ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील अघई परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
Thane Gangrape

Minor Girl Gangrapes In Thane: ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील अघई परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    • Minor Girl Gangrapes In Thane: ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील अघई परिसरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Thane Gangrape News: ठाण्याच्या भिवंडी येथील खारबाव परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सात जणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना ठाणे येथील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अघई येथे पंधरा वर्षाच्या मुलीवर महिनाभर सामूहिक बलात्कार केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Gao Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घट मांडणी; पावसापासून शेतीपर्यंत केले महत्वाचे भाकीत; वाचा

Mumbai Crime : नाश्ता बनवला नाही म्हणून पत्नीच्या डोक्यात मारला हातोडा; कुर्ला येथील धक्कादायक घटना

Maharashtra Weather Update : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले! पुणे, साताऱ्यात ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट

ठाण्यातील शहापूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेशोत्सवाच्या आधापासून पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार सुरु असल्याची माहिती दिली. यानंतर शाहपूर पोलिसांनी ५ जणांविरोधात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या संतापजनक घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे.

kasara ghat accident : कसारा घाटात भीषण अपघात, भरधाव टेम्पो ३०० फूट खोल दरीत कोसळला!

ठाणे: भिवंडीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ठाण्याच्या भिवंडी परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सात जणांनी अत्याचार केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी चार जणांना अटक करण्यात आली असून तीन जण अद्याप फरार असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताच्या एका मित्राने तिला २ ऑक्टोबर २०२३ खारबाव येथील घरात भेटायला बोलावले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने त्याच्या ६ मित्रांनाही बोलावून घेतले. त्यांनीही तिच्यावर आळापाळीने अत्याचार केला. तसेच या घटनेबाबत कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या