मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Update : वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात थंडीची लाट; अनेक जिल्हे गारठले, शेकोट्या पेटल्या

Weather Update : वर्षाच्या सुरुवातीलाच राज्यात थंडीची लाट; अनेक जिल्हे गारठले, शेकोट्या पेटल्या

Jan 02, 2023, 09:05 AM IST

    • Weather Update Live Today : मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान खालावल्यानं राज्यात थंडीची लाट आली आहे. परिणामी आता लोकांनी शेकोट्या पेटवायला सुरुवात केली आहे.
Maharashtra Weather Update Cold Wave (HT)

Weather Update Live Today : मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान खालावल्यानं राज्यात थंडीची लाट आली आहे. परिणामी आता लोकांनी शेकोट्या पेटवायला सुरुवात केली आहे.

    • Weather Update Live Today : मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान खालावल्यानं राज्यात थंडीची लाट आली आहे. परिणामी आता लोकांनी शेकोट्या पेटवायला सुरुवात केली आहे.

Maharashtra Weather Update Cold Wave : नव्या वर्षाची सुरुवात होताच महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीचं प्रमाण झपाट्यानं वाढलं आहे. उत्तर भारतानंतर आता मध्यभारतातील राज्यांमध्येही थंडीची लाट आल्यानंतर आता महाराष्ट्रातील लोकांनी स्वेटरसह उबदार कपडे कपाटातून बाहेर काढले असून अनेक ठिकाणी गारठ्यापासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. परंतु आता सध्याची थंडी पुढचे काही आठवडे कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळं सामान्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

Pune Traffic change : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, मेट्रो कामामुळे 'या' प्रमुख मार्गावरील वाहतुकीत आजपासून मोठा बदल

Pune Aircraft : टग ट्रकच्या धडकेत विमानाला पडले भगदाड! पुणे विमानतळावर रोखले उड्डाण; पुणे- दिल्ली विमानाचा अपघात टळला

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमधील तामनात कमालीची घट झाल्यानं थंडी वाढली होती. आता जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रावर होताना दिसत आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद आणि विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि बुलढाण्यातील तापमानात मोठी घट झाल्यानं विभागात थंडीचं प्रमाण वाढलं आहे. याशिवाय मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढल्यानं लोकांची मोठी पंचाईत झाली आहे. मु्ंबईचं तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्यानं मुंबईकरांना महाबळेश्वरचा फील येत आहे. याशिवाय महाराष्ट्रातील बहुतेक शहरांमध्ये ११ ते १२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

थंडीचा जोर आणखी वाढणार- हवामान खातं

उत्तर आणि वायव्य भारतातील मैदानी भागातून आणि हिमलयातून येणाऱ्या अतिथंड वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातली थंडी वाढली आहे. याशिवाय येत्या काही दिवसांत तापमानात आणखी चार ते पाच अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता असल्यानं थंडीचा कडाका वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि दिल्लीसह राजस्थानात थंडीची लहर आली आहे. त्यामुळं आता पुढील काही दिवस लोकांना आरोग्यासाठी उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे.

पुढील बातम्या