मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  weather update : राज्यात पुढील चार दिवस गारठ्याचे; कोरड्या हवामानामुळे गारवा वाढला

weather update : राज्यात पुढील चार दिवस गारठ्याचे; कोरड्या हवामानामुळे गारवा वाढला

Nov 18, 2022, 12:44 PM IST

    • weather update : राज्यात पुढील काही दिवस थंडीचे राहणार आहेत. हवामानातील कोरडेपणा वाढल्यामुळे रात्रीच्यावेळी तापमानात मोठी घट होत असून गारवा वाढला आहे.
weather update

weather update : राज्यात पुढील काही दिवस थंडीचे राहणार आहेत. हवामानातील कोरडेपणा वाढल्यामुळे रात्रीच्यावेळी तापमानात मोठी घट होत असून गारवा वाढला आहे.

    • weather update : राज्यात पुढील काही दिवस थंडीचे राहणार आहेत. हवामानातील कोरडेपणा वाढल्यामुळे रात्रीच्यावेळी तापमानात मोठी घट होत असून गारवा वाढला आहे.

पुणे : राज्यात पुढील चार दिवस थंडीचे असणार आहे. हवामानातील कोरडेपणा वाढला असून रात्रीचे तापमान मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. यामुळे गारठा वाढणार आहे. ही स्थिती चार दिवस राहणार असून पुन्हा तापमानातील उषणामान वाढण्याशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

राज्यात सध्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारवा वाढला आहे. राज्यात हवामान कोरडे झाले आहे. आकाश निरभ्र असून गेल्या काही दिवसांपासून थंडी ही वाढली आहे. रात्री मोठ्या प्रमाणात तापमान खाली जात आहे. या महिन्यात तब्बल तीन वेळा पुण्याचे तापमान हे १२ डिग्री अंश सेल्सिअस पर्यन्त पोहचले होते.

बंगालच्या उपसागरामध्ये दोन दिवसांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच हिमालयीन विभागात बर्फवृष्टीची शक्यता आहे. याचा परिणाम उत्तकरेकडील राज्यांमधील तापमानात कमी होणार आहे. राज्यात देखील पुढचे चार दिवस तापमान हे कमी राहणार आहे. गुजरातमध्येही किमान तापमान २-३ अंशांनी कमी होणार आहे. २३ नोव्हेंबरपासून या तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान महाबळेश्वरच्या तुलनेत कमी झाले आहेत. या महिन्यात तब्बल तीन वेळा पुण्यातील तापमान घटले होते. मात्र, गुरुवारी नगर राज्यातील सर्वात थंड जिल्हा होता. नगरमध्ये १२.० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात १२.९ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. या सोबतच सोलापूर, सातारा, परभणी, अमरावती, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील तापमान देखील कमी होते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या