मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune : शिवरायांच्या अपमानाविरोधात स्वराज्य संघटना रस्त्यावर, पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवले

Pune : शिवरायांच्या अपमानाविरोधात स्वराज्य संघटना रस्त्यावर, पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवले

Dec 02, 2022, 03:14 PM IST

  • Swarajya Sanghatna protest against governor in Pune : स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यपालांना काळे झेंडे दाखवत त्यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न शुक्रवारी पुण्यात राजभवना समोर करण्यात आला आहे.

पुण्यात राज्यपालांचा स्वराज्य संघटनेने काळे झेंडे दाखवून केला निषेध

Swarajya Sanghatna protest against governor in Pune : स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यपालांना काळे झेंडे दाखवत त्यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न शुक्रवारी पुण्यात राजभवना समोर करण्यात आला आहे.

  • Swarajya Sanghatna protest against governor in Pune : स्वराज्य संघटनेच्या वतीने राज्यपालांना काळे झेंडे दाखवत त्यांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न शुक्रवारी पुण्यात राजभवना समोर करण्यात आला आहे.

पुणे : पुण्यात राजभवना समोर स्वराज्य संघटनाच्या वतीने राज्यपालांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्यात आला. . 'राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या कार्यकर्त्यांना रोखत त्यांना अटक केली. अशा पद्धतीच्या निषेध होण्याची शक्यता असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राज्यपालांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या संदर्भात राज्यपालांचा निषेध करण्यात आला. 'राज्यपाल हटवा, अस्मिता वाचवा', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणा देत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. यावेळी पोलिसांनी घोषणा देणाऱ्यांना रस्त्यातच अडवून त्यांच्या ताब्यातील काळे झेंडे घेण्याचा प्रयत्न केला. तसेच राज्यपालांच्या ताफेच्या दिशेने जाण्यासाठी त्यांना अटकाव करण्यात आला.

स्वराज्य संघटनेचे जे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले त्यांना पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने ताब्यात घेतले आहे. राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर विविध संघटना आक्रमक झाल्याचे चित्र राज्यभरात दिसून येत आहे. खासदार उदयनराजे आणि संभाजी राजे यांनी राज्यपालांच्या विधानावरून त्यांच्यावर टीका करत, त्यांची राज्यपाल पदावरून हकलपट्टी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे.

राज्यपालांनी महत्त्वाच्या पदावर असताना अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात खासदार उदयनराजे आक्रमक होत त्यांनी तीन डिसेंबर रोजी किल्ले रायगड येथे आक्रोश आंदोलन आयोजित केले आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या