मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO : ...तर कशाला झाली असती 'दाटीवाटी'; एकाच कारमध्ये मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री, १ मंत्री अन् प्रदेशाध्यक्ष

VIDEO : ...तर कशाला झाली असती 'दाटीवाटी'; एकाच कारमध्ये मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री, १ मंत्री अन् प्रदेशाध्यक्ष

Jan 17, 2024, 05:32 PM IST

  • Sushma Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एकाच कारमध्ये दाटीवाटीने मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व अजित पवार हे २ उपमुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसल्याचं दिसत आहे.

Sushma andhare share video

Sushma Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एकाच कारमध्ये दाटीवाटीने मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व अजित पवार हे २ उपमुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसल्याचं दिसत आहे.

  • Sushma Andhare : शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एकाच कारमध्ये दाटीवाटीने मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व अजित पवार हे २ उपमुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसल्याचं दिसत आहे.

अजित पवारांच्या एंट्रीनंतर महायुतीतील विसंवाद वाढल्याच्या बातम्या अनेकदा बाहेर येत असतात. त्यातच लोकसभेच्या जागावाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद असल्याचे बोलले जात सताना शिवसेना उपनेत्यासुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर करत महायुतीतील दाटीवाटीवर खोचक टिप्पणी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

Pune Hoarding Collapse : मुंबईनंतर पिंपरी चिंचवड शहरातही होर्डिंग कोसळलं, गाड्यांचं मोठं नुकसान

Mumbai Ghatkopar Hording : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील बचावकार्य ६३ तासांनी पूर्ण; १६ जणांनी गमावला जीव

शिवसेनेचे आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बांशिंग बांधून तयार होते. मात्र, अचानक अजित पवार गटाची एन्ट्री झाली अन् राष्ट्रवादीच्या ९ आमदारांना मंत्रीपदाची लॉटरी लागली. तेव्हापासून शिवसेनेचे आमदार मंत्रिपदासाठी वेटींग लिस्टमध्येच अडकून पडले आहेत. आता लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता नाही. यातच महायुतीत अंतर्गत वाद वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, एकाच कारमध्ये दाटीवाटीने मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व अजित पवार हे २ उपमुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बसल्याचं दिसत आहे. यावरून सुषमा अंधारे यांनी खोचक टोला लगावला आहे.

जर केली नसती सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी..! असे कॅप्शन सुषमा अंधारे यांनी या व्हिडिओसोबत लिहिले आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडिओव्हायरल होत असूनएकाच गाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दाटीवाटीने बसल्याचंदिसून येत आहे.

पुढील बातम्या