मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sushama Andhare: “लपून छपून भेटी-गाठी करायच्या, अंधारात ठेवायचं..”; पवार काका-पुतण्या भेटीबाबत अंधारेंची प्रतिक्रिया

Sushama Andhare: “लपून छपून भेटी-गाठी करायच्या, अंधारात ठेवायचं..”; पवार काका-पुतण्या भेटीबाबत अंधारेंची प्रतिक्रिया

Aug 12, 2023, 11:00 PM IST

  • Andhare on ajit pawar-sharad pawar meeting : शरद पवार व अजित पवार यांच्यातील गुप्त बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sushama andhare 

Andhare on ajit pawar-sharad pawar meeting : शरद पवार व अजित पवार यांच्यातील गुप्त बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावरठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीप्रतिक्रिया दिली आहे.

  • Andhare on ajit pawar-sharad pawar meeting : शरद पवार व अजित पवार यांच्यातील गुप्त बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त बैठक पार पडल्याचे माध्यमातून समोर आले आहे. पवार कुटूंबीयांच्या अत्यंत जवळचे असणारे पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यात पवार काका-पुतण्यामधील बैठक पार पडल्याचे समोर आले आहे. कोरेगाव पार्क येथील चोरडिया यांच्या निवासस्थानी शरद पवार-अजित पवार यांच्यात भेट झाल्याचे माध्यमांनी सांगितले आहे. या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

Ghatkopar Hoarding Collapse : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक

मुंबईतील बोरिवली इथं २१ मे पासून वसंत व्याख्यानमाला; अभ्यासकांसाठी बौद्धिक मेजवानी

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थक आमदारांसह मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये जाऊन शरद पवारांची दोनदा भेट घेतली. शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी ही भेट झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यातच आज पुण्यात या दोन्ही नेत्यांची एका बड्या उद्योगपतीच्या घरी बैठक झाली. या बैठकीत जयंत पाटीलही उपस्थित होते. या गुप्त बैठकीत नेमकी काय चर्चा झाली यावर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. देशात आणि राज्यात त्याचा एक वेगळा ठसा आहे. कुठलीही कृती करताना त्यांना कोणालाही घाबरण्याची किंवा लपवून ठेवण्याची गरज नाही. अजित पवार व पवार साहेबएकत्र येणार असतील तर त्यावर उघडपणे भाष्य करण्याइतके शरद पवार सक्षम आहेत. ते तसे स्पष्टपणे सांगू शकतात. लपून छपून भेटी-गाठी करायच्या आहेत, कार्यकर्त्यांना सहयोगी पक्षांना अंधारात ठेवायचं, असं मला नाही वाटत. जोपर्यंत ते स्पष्टपणे भूमिका मांडत नाहीत, तोपर्यंत आघाडीतील एक जबाबदार आणि महत्त्वाचा घटकपक्ष म्हणून याबाबतीत घाईघाईने निष्कर्ष काढणे तसेच यावर प्रतिक्रिया देणार नाही.

अंधारे म्हणाल्या की, उद्या किंवा परवा शरद पवार मुंबईत बोलणार आहेत, तेव्हा ते यावर स्पष्ट बोलतील. ते चांगल्या प्रकारे या प्रकरणावर प्रकाश टाकू शकतील, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या