मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  New Agriculture Scheme: फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मिळणार १००% अनुदान

New Agriculture Scheme: फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता मिळणार १००% अनुदान

Aug 21, 2023, 06:14 PM IST

  • Bhausaheb Fundkar Falbag Yojana- राज्याच्या फलोत्पादन विभागाकडून माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने ‘स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राबविण्यात येते. आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना

Bhausaheb Fundkar Falbag Yojana- राज्याच्या फलोत्पादन विभागाकडून माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने ‘स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राबविण्यात येते. आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

  • Bhausaheb Fundkar Falbag Yojana- राज्याच्या फलोत्पादन विभागाकडून माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने ‘स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राबविण्यात येते. आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

राज्याच्या फलोत्पादन विभागाकडून माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने ‘स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना’ राबविण्यात येते. या योजने अंतर्गत १५ फळ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत या योजने अंतर्गत फळबागांसाठी खड्डे खोदणे, ठिबक सिंचन यांसारख्या कामांना शंभर टक्के अनुदान देण्यात येते. त्याचबरोबर आता या योजनेतून आवश्यक खतांसाठी देखील १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केली. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीच्या दिवशी मुंडे यांनी ही घोषणा केली.

ट्रेंडिंग न्यूज

Pune yerwada Crime : मुलगा झाला सैतान! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आईचा खून

Maharashtra Weather Update : मुंबईकरांचा निघणार घाम! तर पुणे, कोल्हापूरसह राज्यात अवकाळी पावसाचे पुढील तीन दिवस धुमशान

Mumbai dry day 2024: ‘या’ तीन दिवशी दारू विक्रीवर बंदी! मुंबईतील सर्व वाईन शॉप, बीअर बार राहणार बंद

Gondia : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा बळी; शिक्षक आणि मुख्याध्यापकांमधील वाद सोडवायला गेलेल्या लिपिकाचा मृत्यू

फळबाग लागवड अंतर्गत ठिबक सिंचन करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान देण्यात येते. त्यामुळे आता भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी मुंडे यांनी केले. आवश्यकता भासल्यास शंभर कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ करण्यात येईल अशी माहिती देखील ट्विटर द्वारे दिली आहे.

६ जुलै २०१८ रोजी राज्य सरकारने ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना’ राबविण्यास मान्यता दिली होती. यांतर्गत १५ फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. खड्डे खोदणे, कलमे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे, इत्यादी कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन १०० टक्के अनुदान देते.

यापैकी ठिबक सिंचनाचे अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतुन मिळत असल्याने, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये ठिबक सिंचन ऐवजी आता सर्व प्रकारच्या खतांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे.

पुढील बातम्या