मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओची महिला आयोगाकडून दखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या..

kirit Somaiya: किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओची महिला आयोगाकडून दखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या..

Jul 18, 2023, 08:53 PM IST

  • Rupali chakankar on kirit Somaiya video : रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आतापर्यंत पीडित महिला  आयोगाकडे तक्रार घेऊन आली नाही. तर आपण कारवाई करतोच.

Rupali chakankar on kirit Somaiya

Rupali chakankar on kirit Somaiya video : रुपाली चाकणकर म्हणाल्या की,आतापर्यंत पीडित महिला आयोगाकडेतक्रार घेऊन आली नाही.तर आपण कारवाई करतोच.

  • Rupali chakankar on kirit Somaiya video : रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आतापर्यंत पीडित महिला  आयोगाकडे तक्रार घेऊन आली नाही. तर आपण कारवाई करतोच.

महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करत रान उठवून देणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारण खळबळ माजली आहे. या व्हिडिओ निमित्त विरोधकांच्या हातात आयतं कोलीत मिळालं असून याचे पडसाद विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. विरोधकांनी टिकेची झोड उठवल्यानंतर आता राज्य महिला आयोगानेही याची दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी किरीट सोमय्यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

 

माध्यमांना प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आतापर्यंत पीडित महिला आयोगाकडे तक्रार घेऊन आली नाही. तर आपण कारवाई करतोच. त्याहीपुढे जाऊन सामूहिक बलात्कार किंवा इतर गुन्ह्यांमध्ये आपण स्वतः दखल घेतो. त्यामुळे पीडित महिलांची तक्रार आली, तर त्याची नक्कीच दखल घेतली जाऊल. आतापर्यंत या प्रकरणी आयोगाकडे कोणतीही माहिती आलेली नाही. पोलिसांचा आम्हाला अहवाल येईल तेव्हा त्यावर आम्ही कारवाई करू, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.

रुपाली चाकणकर म्हणाल्या की, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी राज्य महिला आयोगाकडे याबाबत विचारणा केली होती. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून याबाबत मुंबई पोलीस आयुक्तांना तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणीचा अहवाल लवकरात लवकर आयोगाला सादर करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

सोमय्यांचं फडणवीसांना पत्र-

किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, देवेंद्रजी,आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडीओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत. अशा प्रकारच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे.

 

मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडीओ क्लिप आहेत,असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी विनंती किरीट सोमय्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या