मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahaparinirvan Din : मोठी बातमी! ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी सरकारी सुट्टी जाहीर

Mahaparinirvan Din : मोठी बातमी! ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी सरकारी सुट्टी जाहीर

Dec 05, 2023, 05:44 PM IST

  • Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din :  राज्य सरकारने ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनानिमित्त सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.  मुंबई काँग्रेसच्या मागणीला यश आले आहे

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Din

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : राज्य सरकारने ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनानिमित्त सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई काँग्रेसच्या मागणीला यश आले आहे

  • Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din :  राज्य सरकारने ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिनानिमित्त सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.  मुंबई काँग्रेसच्या मागणीला यश आले आहे

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजेच ६ डिसेंबर रोजी प्रशासनाने पत्रक काढून सुट्टी जाहीर केली आहे. ६ डिसेंबर रोजी मुंबईत चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रचंड भीमसागरासाठी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी मागणी केली होती. आता या मागणीला यश आले आहे. प्रशासनाने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांना सुट्टी लागू केली, अशी माहिती मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. 

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

सरकारने परिपत्रक काढून म्हटले आहे की, १८ सप्टेंबर १९९६ अन्वये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी दिवशी व २००७ पासून गोपाळकाळा (दहीहंडी) निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आता २०२३ मध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्स सरकारी व निमसरकारी कार्यालयांना तिसरी स्थानिक सुट्टी देण्यात येत आहेत.

६ डिसेंबर या दिवशी सर्वांनाच चैत्यभूमीवर (Chaityabhumi)  अभिवादन करणं शक्य व्हावं, यासाठी मुंबई शहर,  उपनगरे, ठाणे, नवी मुंबई परिसरातील सरकारी कार्यालयांसह खासगी कार्यालयांनाही सुटी जाहीर करा, अशी मागणी करणारं पत्र प्रा. वर्षा गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं. आता सततच्या पाठपुराव्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी आणि गरीब, दलित व मागास वर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी दाखल होत असतात. मात्र, आता या दिवशी सर्व कार्यालये बंद राहणार असून अनेक अनुयायींना महामानवास अभिवादन करणे शक्य होणार आहे, अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या