मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kokan Railway News : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवाला कोकणात रेल्वेच्या २२ विशेष फेऱ्या, पाहा वेळापत्रक

Kokan Railway News : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवाला कोकणात रेल्वेच्या २२ विशेष फेऱ्या, पाहा वेळापत्रक

Aug 13, 2023, 09:34 AM IST

    • Kokan Railway News : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
ganpati special train 2023 konkan railway (HT)

Kokan Railway News : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

    • Kokan Railway News : गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

ganpati special train 2023 konkan railway : येत्या काही दिवसांतच महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं असंख्य सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांनी सुट्टी टाकत कुटुबियांसोबत वेळ घालवण्याचं प्लॅनिंग केलं आहे. त्यातच आता मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुंबईहून कोकणात गणपती विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यानुसार अधिकच्या २२ गाड्या कोकणात धावणार आहे. विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार असल्याने अनेकांनी आतापासूनच बुकिंग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळं आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Parbhani News : परभणी हादरली! तू माझ्या पत्नीसारखीच म्हणत सासऱ्याचा सुनेवर बलात्कार

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

भारतीय रेल्वेने उधना ते मडगाव, अहमदाबाद ते कुडाळ आणि उधना ते मंगळुरू या रेल्वेंच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच कोकण रेल्वे मार्गावर दोनशेहून अधिक फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता अधिकच्या २२ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. वसईमार्गे जाणाऱ्या उधना ते मडगाव या रेल्वेच्या १० फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. उधना-मंगळुरू या रेल्वेच्या सहा फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. ही रेल्वे वसई रोड स्थानकातून जाणार आहे. याशिवाय अहमदाबाद-कुडाळ या रेल्वेच्या सहा अधिकच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे. या तिन्ही रेल्वे १३ ते २७ सप्टेंबरदरम्यान दर बुधवारी आणि गुरुवारी धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

मुंबईच्या वेगवेगळ्या स्टेशन्सवरूनही कोकणात अनेक रेल्वे गाड्या जात असतात. त्यामुळं कर्मचारी तसेच विद्यार्थी कोकणात जाण्यासाठी मोठी गर्दी करत असतात. गणेशोत्सवाच्या काळात कोकणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये सर्वाधिक चाकरमान्यांचा समावेश असतो. लोकांनी घरी जाण्यासाठी यापूर्वीच बसेस, ट्रॅव्हल्स आणि ट्रेन बुकिंग सुरू केली आहे. परंतु आता कोकणात जाणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढवण्यात आल्याने कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पुढील बातम्या