मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Traffic Block : २१ जूनला पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करताय? मग ही बातमी वाचाच

Mumbai Traffic Block : २१ जूनला पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करताय? मग ही बातमी वाचाच

Jun 20, 2023, 09:54 PM IST

  • Western Railway : पश्चिम रेल्वेने मंगळवारी जाहीर केले की, बुधवार,२१ जून रोजी ट्रॅफिक ब्लॉकमुळे काही गाड्यांवर परिणाम होईल. काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

Western Railway train affected on June 21

Western Railway : पश्चिम रेल्वेने मंगळवारी जाहीर केले की, बुधवार,२१ जून रोजी ट्रॅफिक ब्लॉकमुळे काही गाड्यांवर परिणाम होईल. काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

  • Western Railway : पश्चिम रेल्वेने मंगळवारी जाहीर केले की, बुधवार,२१ जून रोजी ट्रॅफिक ब्लॉकमुळे काही गाड्यांवर परिणाम होईल. काही गाड्या रद्द केल्या आहेत तर काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

मुंबई – पश्चिम रेल्वे मार्गावर बुधवार,२१ जून रोजी ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे अनेक गाड्यांवर याचा परिणाम होईल. पश्चिम रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे की २१ जून रोजी सकाळी ०८:५५ ते १०:४० वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक असेल. ब्लॉक दरम्यान, सफाळे रेल्वे स्टेशनवर ROB 106 A च्या बांधकामासाठी ५ गर्डर टाकण्याचे काम केले जाईल. ट्रफिक ब्लॉक कालावधीत, पश्चिम रेल्वेच्या काही गाड्या रद्द केल्या जातील, काही शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील, तर अंशतः रद्द केल्या जातील असे निवेदनात म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Lok sabha : मतदानाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू, होमगार्डला हृदयविकाराचा धक्का

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

 

२१ जून रोजी रद्द केलेल्या गाड्या -

  • १. गाडी क्रमांक ०१३३७ बोईसर - वसई रोड मेमू
  • २. गाडी क्र. ९०४५० विरार - चर्चगेट लोकल १२:०० वा.

 

शॉर्ट टर्मिनेट व अंशत: रद्द केलेल्या गाड्या -

  • १. ट्रेन क्रमांक ०१३३८ डोंबिवली – बोईसर MEMU वसई रोडपर्यंत धावेल. त्यामुळे वसई रोड आणि बोईसर दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.
  • २. गाडी क्रमांक ९३००८ डहाणू रोड - बोरिवली लोकल केळवे रोड येथपर्यंत धावेल. त्यामुळे केळवे रोड ते बोरिवली दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.
  • ३. ट्रेन क्रमांक ९३००९ चर्चगेट – डहाणू रोड लोकल चर्चगेट आणि केळवे रोड दरम्यान अशत:रद्द राहील आणि केळवे रोड ते डहाणू रोड दरम्यान धावेल.
  • ४. गाडी क्रमांक ९३०१० डहाणू रोड - विरार लोकल केळवे रोड पर्यंत धावेल आणि केळवे रोड ते विरार दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.
  • ५. ट्रेन क्रमांक ९३०११ चर्चगेट - डहाणू रोड लोकल चर्चगेट आणि केळवे रोड दरम्यान अंशतः रद्द राहील आणि केळवे रोड ते डहाणू रोड दरम्यान धावेल.
  • ६. ट्रेन क्र.१९००२ सुरत - विरार एक्स्प्रेस पालघर येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाईल आणि त्यामुळे पालघर आणि विरार दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.
  • ७. ट्रेन क्रमांक ०९१४३ विरार - वलसाड विरार आणि पालघर दरम्यान अंशतः रद्द राहील आणि पालघर आणि वलसाड दरम्यान धावेल.

 

वेळाने धावणाऱ्या गाड्या -

  • १. ट्रेन क्र. २०९३२ इंदूर - कोचुवेली एक्सप्रेस ०१.१५ तासांनी विलंबाने धावेल.
  • २. ट्रेन क्रमांक १२४७९ जोधपूर - वांद्रे टर्मिनस सूर्य नगरी एक्सप्रेस ५० मिनिटांनी विलंबाने धावेल.
  • ३. ट्रेन क्रमांक २२९५६ भुज - वांद्रे टर्मिनस कच्छ एक्सप्रेस ५० मिनिटांनी विलंबाने धावेल.
  • ४. ट्रेन क्रमांक १२९३४ अहमदाबाद - मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेस ३० मिनिटांनी वेळांनी धावेल.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या