मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur News : सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले, भीम आर्मी आक्रमक

Solapur News : सोलापुरात चंद्रकांत पाटलांवर शाईफेक; घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवले, भीम आर्मी आक्रमक

Oct 15, 2023, 09:23 PM IST

  • chandrakant patil : सोलापुरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडा दाखवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली.

chandrakant patil

chandrakant patil : सोलापुरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडा दाखवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली.

  • chandrakant patil : सोलापुरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडा दाखवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली.

कंत्राटी पोलीस भरतीवरून राज्यात राजकारण तापलं आहे. कंत्राटी भरतीवरून विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात असून शरद पवारांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. याच कंत्राटी भरतीच्या विरोधात भीम आर्मी संघटनाही आक्रमक झाली आहे. चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने शाई फेकून चंद्रकांत पाटील यांना विरोध केला. कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ सोलापुरातील भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडा दाखवण्याचा प्रयत्न करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी त्यांच्यावर शाईफेकीचा प्रयत्न झाल्याचेही बोलले जात आहे. त्यानंतर पोलिसांनी भीम आर्मीच्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! येत्या २२ तारखेला 'या' भागातील पाणीपुरवठा १६ तासांसाठी राहणार बंद

Fact Check: लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे आणि शिंदे गट भाजपमध्ये विलिन होणार? सत्य काय? वाचा!

Navi Mumbai: नववीत शाळा सोडली, युट्यूबवर पाहून नोटा छापायचं शिकला, 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात!

maha ssc hsc board result 2024 : प्रतीक्षा संपली! पुढच्या आठवड्यात जाहीर होणार दहावीचा निकाल, बारावीचा कधी?

पालकमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर चंद्रकात पाटील पहिल्यांदाच दोन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. रविवारी सायंकाळी आठ वाजता त्यांचे सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात आगमन झाले. याचवेळी भीम आर्मीच्या एका कार्यकर्त्याने त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यामुळे वातावरण तणावमय झाल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सायंकाळीच्या सुमारास त्यांचे सोलापुरात आगमन झाल्यानंतर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रात्री आठ वाजता ते शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. तेथे आधीपासूनच असलेल्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवून सरकारविरोधी घोषणाबाजी केली.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता, मात्र भीम आर्मीचे एका कार्यकर्त्याने अचानक येत पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. या गोंधळानंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या