मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ...तर मंदिर, मशिदीसह राजकीय भोंगेही बंद करा; राज्यमंत्री बच्चू कडू यांची टीका

...तर मंदिर, मशिदीसह राजकीय भोंगेही बंद करा; राज्यमंत्री बच्चू कडू यांची टीका

May 19, 2022, 12:39 PM IST

    • राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. महागाईचा मुद्दा महत्वाचा असतात त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. भोंगावर कारवाई करायची असेल तरी केवळ मंदिर आणि मशिंदीवरीलच नाही तर राजकीय नेत्यांच्या भोंग्यावरही केली पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.
राज्यमंत्री बच्चू कडू (HT_PRINT)

राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. महागाईचा मुद्दा महत्वाचा असतात त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. भोंगावर कारवाई करायची असेल तरी केवळ मंदिर आणि मशिंदीवरीलच नाही तर राजकीय नेत्यांच्या भोंग्यावरही केली पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.

    • राज्यात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. महागाईचा मुद्दा महत्वाचा असतात त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. भोंगावर कारवाई करायची असेल तरी केवळ मंदिर आणि मशिंदीवरीलच नाही तर राजकीय नेत्यांच्या भोंग्यावरही केली पाहिजे, असे बच्चू कडू म्हणाले.

अमरावती : सध्या भोंग्याच्या प्रश्नावरून राज्यातील राजकारण पेटले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूत्ववादाचा पुरस्कार करत गुडीपाडव्याच्या सभेत त्यांनी मशिदीवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित करत ते खाली उतरवण्यासाठी सरकारला अल्टिमेटमही दिला. याला मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तसेच त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनीही याला विरोध केला. मात्र, राज ठाकरे त्यांच्या मुद्यावर कायम राहिले आहेत. दरम्यान,  त्यांच्या या भूमिकेवरून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्येही आरोप प्रत्यारोपांचे युद्ध सुरू झाले आहे. या मुद्यावरून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. आता त्यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही उडी घेत राज ठाकरे यांना लक्ष केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

HSC Result 2024: महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या, एका क्लिकवर पाहा तुमचं रिझल्ट

Mumbai Constable Death : 'त्या' पोलिसाचा मृत्यू विषारी इंजेक्शनमुळे नाही; फॉरेन्सिक रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

Kolhapur Murder : भरदिवसा आईच्या डोळ्यादेखत तरुणाला संपवलं; सैन्य दलातील जवानासह तिघे आरोपी फरार

Pune porsche Accident : दोघांना चिरडणाऱ्या बिल्डरच्या मुलाला जामीन; न्यायालयाने आरोपीला लिहायला लावला ३०० शब्दांचा निबंध

अमरावती येथे कार्यक्रमात ते बोलत होते. कडू म्हणाले, सध्या महत्वाच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष विचलीत केले जात आहेत. देशातील महागाईच्या प्रश्नावर कुणीच बोलतांना दिसत नाही. फक्त धार्मिक मुद्दे उचलल्या जात आहे. राज ठाकरे यांच्या भोंग्याच्या मुद्यावर निशाना साधत कडू म्हणाले, ‘मंदिर, मशिदीसह निवडणुकीतील राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा. राजकीय नेत्यांचे निवडणुकीतील भोंगेही बंद करायला हवे. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व मंदिर,ब् ाौद्ध विहार, मशिदी मधील भोंगे बंद होते. त्यावेळी फक्त रुग्णवाहिकेरील भोंगा सुरू होता. देशात सध्या काय परिस्थिती आहे. मूळ मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात आहे. भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजे. निवडणूकीत राजकीय लोकांचे भोंगे बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा असा उपरोधीक टोला ही बच्चू कडू यांनी लगावला आहे.

दरम्यान संजय राऊत यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपने एमआयएमच्या ओवेसींचा वापर केला. आता राज्यातही भाजपने एक ओवेसी तयार केला आहे. हा ओवसी राज्यात तेढ निर्माण करत आहे. भाजपने त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवत राज्यात अशांतता माजवण्याचा प्रयत्न करत आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या