मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  तुळजाभवानीच्या दागिन्यांसह चांदीचा मुकुटही गहाळ, महंत फरार

तुळजाभवानीच्या दागिन्यांसह चांदीचा मुकुटही गहाळ, महंत फरार

Dec 21, 2023, 07:39 PM IST

  • Tulja Bhavani Ornaments : तुळजाभवानीचा चांदीचा मुकटू गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर आरोप असलेले महंत चिलोजीबुवाही फरार झाले आहेत.

Tulja Bhavani

Tulja Bhavani Ornaments : तुळजाभवानीचा चांदीचा मुकटू गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर आरोप असलेले महंत चिलोजीबुवाही फरार झाले आहेत.

  • Tulja Bhavani Ornaments : तुळजाभवानीचा चांदीचा मुकटू गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर आरोप असलेले महंत चिलोजीबुवाही फरार झाले आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चांदीचा मुकूटही गहाळ झाला आहे. मंदिराच्या खजिन्यातून ६३ भार वजन असलेला चांदीचा मुकूट गहाळ झाल्याचे  समोर आल्याने खळबळ माजली आहे. मंदिर संस्थान कडून याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत २०११ सालापूर्वी चांदीचा मुकुट मंदिरातून गायब झाला असल्याचा संशय व्यक्त केली आहे. हा चांदीचा मुकुट महंत चिलोजीबुवा यांच्या ताब्यात होता. आता महंत चिलोजीबुवाही फरार झाले असून पोलिसांसमोर तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

Dadar Illegal Hoardings: दादर येथील टिळक पुलावर ८ बेकायदेशीर होर्डिंग, मुंबई महानगरपालिकेची माहिती

Pune Hoarding Collapse: पुणे-सोलापूर मार्गावर मंगल कार्यालयासमोर होर्डिंग कोसळलं; बँड पथकासह नवरदेवाचा घोडाही अडकला

Worli Rape: नोकरीचे आमिष दाखवत तरुणीला जाळ्यात अडकवलं, भेटायला बोलवून बलात्कार; वरळीतील घटना

मिळालेल्या माहितीनुसार चांदीची प्रभावळ, चांदीचे त्रिशूळ, मोत्याचे आणि सोन्या-चांदीचे दुर्मिळ आणि पुरातन अलंकाराचा मोठा ऐवज तुळजाभवानी देवीच्या खजिन्यातून गहाळ झाला आहे.  तुळजाभवानी देवीचा सोन्याचा सुमारे एक किलो वजनाचा मुकुट गहाळ झाल्याच्या प्रकाराने खळबळ माजली असतानाच आता चांदीचा मुकूटही गहाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

दरम्यान मंदिर प्रशासनाने सोन्याचा मुकुट सापडल्याचा दावा केला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तहसीलदार सोमनाथ माळी यांना तक्रार देण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. माळी यांनी दिलेल्या तक्रारीत ४३ भार वजन असलेला चांदीचा मुकूट गहाळ झाल्याचे म्हटले आहे. 

तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील एक ते सात डब्यात असलेल्या पुरातन,  दुर्मिळ आणि मौल्यवान असलेल्या अलंकारांपैकी १७ अलंकार खजिन्यातून गायब झाले आहेत. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी चार तुळजाभवानी देवीचे महंत आहेत. या चार महंतांपैकी तीन महंतांचा मृत्यू झाला असून चिलोजीबुवा हे एकमेव आरोपी सध्या हयात आहेत.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या