मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिवसेनेकडे गृहखाते नसल्यानेच एकनाथ शिंदेंच्या बंडाळीबाबत ठाकरे अंधारात राहिले…

शिवसेनेकडे गृहखाते नसल्यानेच एकनाथ शिंदेंच्या बंडाळीबाबत ठाकरे अंधारात राहिले…

HT Marathi Desk HT Marathi

Jun 22, 2022, 10:32 PM IST

    • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहखातं नसल्यानेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतर्गत बंडाळीबाबत ते अंधारात राहिले असावेत, असं मत माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
Ex CM Prithviraj Chavan released journalist Rasheed Kidwai 's book

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहखातं नसल्यानेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतर्गत बंडाळीबाबत ते अंधारात राहिले असावेत, असं मत माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

    • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहखातं नसल्यानेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतर्गत बंडाळीबाबत ते अंधारात राहिले असावेत, असं मत माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद होतं, परंतु गृहखातं नव्हतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे गृहखातं नसल्यानेच एकनाथ शिंदे यांच्या पक्षांतर्गत प्रचंड बंडाळीबाबत ते पूर्णपणे अंधारात राहिले असावेत, असं मत माजी मुख्यमंत्री, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

ट्रेंडिंग न्यूज

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

Pune BGF jewellers daroda : वानवडीतील वाडकर मळा येथील बीजीएफ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; ३०० ते ३५० ग्रॅम दागिने लंपास

दिल्ली स्थित ज्येष्ठ पत्रकार रशिद किदवई यांनी लिहिलेल्या ‘लिडर्स, पॉलिटिशियन्स, सिटिजन्स - फिफ्टी फिगर्स हू इन्फ्लुएन्स्ड इंडियाज पॉलिटिक्स’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबई प्रेस क्लब येथे झाले. या पुस्तक प्रकाशन समारंभात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजप प्रवक्ते राजीव पांडे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष अयाज मेमन आणि कार्याध्यक्ष गुरबीर सिंह उपस्थित होते. यावेळी आयोजित चर्चासत्रात चव्हाण बोलत होते.

‘१९९९ साली कॉंग्रेस- राष्ट्रवादीचं सरकार पहिल्यांदा सत्तेवर आलं तेव्हा आपण ‘ज्या पक्षाचा मुख्यमंत्री, त्या पक्षाकडे गृहखातं’ असं समिकरण मांडलं होतं’ , अशी माहिती चव्हाण यांनी यावेळी दिली. मोठ्या संख्येने शिवसेनेचे आमदार मुंबईतून सूरतच्या दिशेने निघून जात असताना त्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना नसणं ही मोठी चूक होती आणि ती चूक शिवसेनेला भोवली असल्याचे मत चव्हाण यांनी व्यक्त केलं.

पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले, ‘विलासराव देशमुख, सुशिलकुमार शिंदे, अशोक चव्हाण आणि मी स्वतः मुख्यमंत्री असताना गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच होते. किंबहुना महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसने गृहखातं स्वतःकडेच ठेवलं’, असं चव्हाण म्हणाले.

या पुस्तकात पत्रकार किदवई यांनी भारतीय राजकारणातील ५० निवडक नेत्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंचे चित्रण केले आहे. या पुस्तकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला, मिझोरामचे माजी मुख्यमंत्री लालडेंगा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ए आर अंतुले, कॉंग्रेस पक्षाचे कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा, ज्येष्ठ कवी नामदेव ढसाळ, कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार अहमद पटेल, समाजवादी पक्षाचे माजी खासदार अमरसिंह आणि चंद्रास्वामी या आणि इतर व्यक्तिमत्वांचा समावेश आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या