मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CM याचा नवा अर्थ Corrupt Manus; हे घोटाळेबाजांचे सरकार, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

CM याचा नवा अर्थ Corrupt Manus; हे घोटाळेबाजांचे सरकार, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात

Mar 12, 2023, 09:55 PM IST

  • aaditya Thackeray criticize  Cm Eknath shinde : आदित्य ठाकरे म्हणाले की, आता सीएम म्हणजे करप्ट माणूस असा अर्थ होत आहे. जनतेचा सर्व पैसा ते कंत्राटदार मित्रांसाठी वापरत आहेत.

आदित्य ठाकरेंचा घणाघात

aadityaThackeraycriticize Cm Eknath shinde : आदित्य ठाकरे म्हणाले की,आता सीएम म्हणजे करप्ट माणूस असा अर्थ होत आहे.जनतेचा सर्वपैसा ते कंत्राटदार मित्रांसाठी वापरत आहेत.

  • aaditya Thackeray criticize  Cm Eknath shinde : आदित्य ठाकरे म्हणाले की, आता सीएम म्हणजे करप्ट माणूस असा अर्थ होत आहे. जनतेचा सर्व पैसा ते कंत्राटदार मित्रांसाठी वापरत आहेत.

शिवसेना युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची गोरेगाव पूर्व येथील छत्रपती संभाजी मैदानावर शिवगर्जना सभा झाली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ४० बंडखोर आमदारांवर चांगलाच आसूड ओढला. आदित्य ठाकरे म्हणाले की, आता सीएम म्हणजे करप्ट माणूस असा अर्थ होत आहे. जनतेचा सर्व पैसा ते कंत्राटदार मित्रांसाठी वापरत आहेत. राज्यात मोठ मोठे घोटाळे होत आहेत, हे आम्ही नाही तर भाजपचे आमदारच तक्रार करत आहेत. राज्यात आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठीही बोली लावली जात आहे, ही परिस्थिती धोकादायक आहे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी सरकारवर केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

Godan Express : गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून येऊ लागला धूर, घाबरलेल्या प्रवाशांच्या रेल्वेतून उड्या

आदित्य म्हणाले की, हिंमत असेल तर समोर या, बघू कोणात किती हिंमत आहे. पाठीमागून वार करू नका. मी वरळीत निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते. ठाणेही शिवसेनेचेच आहे. मी ठाण्यातूनही चारहात करायला तयार आहे. निवडणुकीचा निकाल काय लागेल, याचा अंदाज कसब्याच्या निवडणुकीवरून आला असेलच. तुम्हाला काय कमी दिले होते की तुम्ही पाठित खंजीर खुपसला हा एकच माझा सवाल असल्याचे आदित्य म्हणाले.

आधी राज्यातील प्रकल्प गुजरातले गेले. त्यापाठोपाठ येथील तरुणांचे रोजगारही गेले. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालयही दिल्लीला हलवण्यात आले आहे.

आदित्य म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकार मुंबईकरांना लुटण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी त्यांनी हिंदुत्वाच्या प्रश्नावरूनही शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. आमचे हिंदुत्व, तुमच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. आमचे हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन जाणारे आहे, असंही त्यांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईचे पाच मंत्री होते. त्यामुळे मुंबईसाठी जे करता येईल त्यासाठी कोणतीही तडजोड आम्ही केली नाही. आता केवळ एक मंत्री मुंबईचा असून त्यांनाही मुंबईच्या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळे मुंबईसासाठी कसे काम करणार असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.आताच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान नाही. 

आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांचा पैसा आणि मुंबईकरांना महानगरपालिकेकडून मिळत असलेल्या सोयींबद्दल सवाल उपस्थित करत हे सरकार मुंबईकरांवर अन्याय करत असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. 

पुढील बातम्या