मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  bhagat singh koshyari : कोश्यारी वादग्रस्त विधाने का करत होते? चंद्रकांत खैरेंचा मोठा गौप्यस्फोट

bhagat singh koshyari : कोश्यारी वादग्रस्त विधाने का करत होते? चंद्रकांत खैरेंचा मोठा गौप्यस्फोट

Feb 12, 2023, 06:25 PM IST

  • bhagat singh koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादग्रस्त वक्तव्ये का करत होते व त्यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीला परवानगी का दिली नाही, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

चंद्रकांत खैरेंचा मोठा गौप्यस्फोट

bhagat singh koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादग्रस्त वक्तव्ये का करत होते व त्यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीला परवानगी का दिली नाही, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • bhagat singh koshyari : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सतत वादग्रस्त वक्तव्ये का करत होते व त्यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीला परवानगी का दिली नाही, याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मुंबई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा आजा मंजूर करण्यात आला. त्यांच्याजागी रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील राज्यपालांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना मोठा गौफ्यस्फोट केला आहे. खैरे म्हणाले की, राज्यपाल कोश्यारींवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून दबाव होता. 

ट्रेंडिंग न्यूज

Manoj jarange patil : ..अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Pandharpur news : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर भाजपच्या वरिष्ठांचा खूप दबाव आहे, त्यामुळे मला हे असं वागावं लागतं असं भगतसिंह कोश्यारी यांनी मला सांगितलं होतं, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.  आता नव्या राज्यपालांनी तरी कोश्यारींसारखं वागू नये, जर भाजपने तुमच्यावर दबाव टाकला तर तुमचे नाव अशा प्रकारे खराब होऊ शकते. त्यामुळे राज्यपालांनी दबावाला बळी पडू नये, असं खैरे यांनी म्हटलं आहे.

भाजपने राज्यपालांच्या राजीनाम्यावर खूप उशिरा निर्णय घेतला. राज्यपालांनी अनेकदा महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने केली आहेत. १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मी एकदा राज्यपालांची भेट घेतली होती, त्यावेळी त्यांनी सांगितले की, माझ्यावर भाजपचा खूप दबाव आहे. त्यांनी माझ्याकडे तशी कबुली दिली होती. 

खैरे म्हणाले की, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर बसणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था झाली आहे. त्यांना घालवण्यासाठी लोकांनी आंदोलने, निषेद मोर्चे काढावे लागले. त्यांच्या पुतळ्याला व प्रतिमेला जोडे मारले गेले, पुतळे जाळले गेले. त्यांनी यापूर्वीय जायला पाहिजे होते.

पुढील बातम्या