मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Abdul Sattar: कुत्रा चिन्हावरही मी निवडून येईन ; अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

Abdul Sattar: कुत्रा चिन्हावरही मी निवडून येईन ; अब्दुल सत्तार यांचे वक्तव्य

Sep 26, 2022, 01:31 PM IST

    • Abdul Sattar: मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरून काँग्रेसने अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.
मंत्री अब्दुल सत्तार (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Abdul Sattar: मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरून काँग्रेसने अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.

    • Abdul Sattar: मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरून काँग्रेसने अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Abdul Sattar: राज्यात शिवसेनेच्या निष्ठा यात्रेला उत्तर म्हणून शिंदे गटाकडून हिंदू गर्व गर्जना यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीरला राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थित होते. तेव्हा त्यानी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा आहे. मला कुत्रा निशाणी मिळाली तरी मी निवडून येतो असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. यावरून काँग्रेसने अब्दुल सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pandharpur Darshan : भाविकांसाठी आनंदवार्ता! पंढरपूरच्या विठुरायाचे पदस्पर्श दर्शन ‘या’ तारखेपासून पुन्हा होणार सुरू

mahadev betting app : महादेव बुक बेटींग ॲपमधून नारायणगावात कोट्यवधी रुपयांची उलाढाल; गैरकारभारासाठी पैसा वळवला परदेशात

Pune Urulikanchan news : वीज कडाडल्याच्या आवाजाने पुण्यात तीन महिला पडल्या बेशुद्ध! एकीचा मृत्यू

Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की, मी अगोदर काँग्रसमध्ये होतो, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत आलो. मात्र हिंदू विचारसरणीवाल्या उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मिळून मविआची स्थापना केली. मी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलो, तर ह्यांनी पुन्हा काँग्रेससोबतच हातमिळवणी केली. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी ४० जणांसह भाजपसोबत सरकार स्थापन केलं.

उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना आम्हाला दोन मिनिटं भेटत नव्हते. पण मुख्यमंत्री शिंदे मध्यरात्री दोन वाजताही भेटतात. मी सिल्लोड मतदारसंघात २५ वर्षांपासून निवडून येत आहे. मला जर कुत्रा निशाणीवर उभा केलं तरीही मीच निवडून येतो. कारण कुत्रासुद्धा मालकासोबत वफादार असतो असं अब्दुल सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून टीका करण्यात आली. विरोधकांकडून आता सत्तार यांच्यावर या वक्तव्यामुळे निशाणा साधला जात आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या