मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : आणखी बरंच काही घडणार आहे… सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर संजय राऊत यांचा सूचक इशारा

Sanjay Raut : आणखी बरंच काही घडणार आहे… सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर संजय राऊत यांचा सूचक इशारा

Jul 18, 2023, 02:55 PM IST

  • Sanjay Raut on Kirit Somaiya Video : भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओवर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut - Kirit Somaiya

Sanjay Raut on Kirit Somaiya Video : भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओवर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Sanjay Raut on Kirit Somaiya Video : भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या अश्लील व्हिडिओवर संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut on Kirit Somaiya Video : भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ते अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर महिला अत्याचाराचे आरोप होत आहेत. किरीट सोमय्या यांनी हे आरोप फेटाळले असले तरी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी सोमय्यांसह भाजपलाही घेरलं आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी यावर सूचक ट्वीट केलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आठवडाभर वाढणार; मान्सूनबाबतही गुड न्यूज

Akola Accident: अकोल्यात अरुंद पुलावर ओव्हरटेक करताना तांदळाने भरलेली ट्रक पलटली, कारमधील ४ जण दबले

किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ 'लोकशाही' या वृत्तवाहिनीनं काल प्रसिद्ध केला होता. त्यावरून मोठा गदारोळ झाला. त्याचा अनुषंगानं राऊत यांनी आज ट्वीट केलं आहे. हे ट्वीट बरंच सूचक आहे. ‘आमच्यावर आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते सांगायचे, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका. नेमके तसेच घडत आहे. यापुढे देखील बरेच काही घडणार आहे. जे जे होईल ते पाहत राहावे,’ असा इशाराच त्यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या हे आरोप करण्यासाठी व तक्रारी करण्यासाठी ओळखले जातात. त्यांनी आजवर भाजपच्या विरोधातील अनेक नेत्यांवर आरोप केले आहेत. पत्रा चाळ प्रकरणात त्यांनी संजय राऊत यांच्यावरही अनेक आरोप केले होते. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सोमय्या यांना उत्तर दिलं होतं. सोमय्या यांच्यावरही त्यांनी घोटाळ्याचे आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी निधी गोळा केल्याचा व शौचालय घोटाळा केल्याचा आरोपही राऊत यांनी सोमय्यांवर केला होता. मात्र, शिदे-फडणवीस सरकार येताच सोमय्यांना क्लीन चिट मिळाली.

सोमय्यांनी घोटाळ्याचे आरोप केलेले बहुतेक नेते व माजी मंत्री आता भाजपमध्ये आहेत किंवा भाजपच्या सरकारमध्ये आहेत. त्यामुळं सोमय्यांची आधीच कोंडी झाली आहे. त्यातच हे व्हिडिओ प्रकरण चव्हाट्यावर आलं आहे. त्यामुळं संजय राऊत काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष होतं. सध्या तरी राऊत यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, पुढं बरंच काही व्हायचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आणखी काय प्रकरणं बाहेर येतात हे पाहावं लागणार आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या