मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अदानींच्या धारावी प्रकल्पाविरोधात UBT गटाचा मुंबईत महामोर्चा, मविआ कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO

अदानींच्या धारावी प्रकल्पाविरोधात UBT गटाचा मुंबईत महामोर्चा, मविआ कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO

Dec 16, 2023, 05:01 PM IST

  • Shivsena UBT Morcha : अदानी ग्रुपकडून धारावीचा पुनर्विकास करण्याऐवजी सरकारने स्वत: धारावीचा विकास करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्ध टाकरे गटाकडून मुंबईतील अदानी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

Shiv sena ubt morcha

Shivsena UBT Morcha : अदानी ग्रुपकडून धारावीचा पुनर्विकास करण्याऐवजी सरकारने स्वत: धारावीचा विकास करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्ध टाकरे गटाकडून मुंबईतील अदानी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

  • Shivsena UBT Morcha : अदानी ग्रुपकडून धारावीचा पुनर्विकास करण्याऐवजी सरकारने स्वत: धारावीचा विकास करावा, या मागणीसाठी शिवसेना उद्ध टाकरे गटाकडून मुंबईतील अदानी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अदानी उद्योग समुहाच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात महामोर्चा पुकरला आहे. अदानी ग्रुपकडून धारावीचा पुनर्विकास करण्याऐवजी सरकारने स्वत: धारावीचा विकास करावा, अशी प्रमुख मागणी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात येत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात शिवसैनिकांसह महाविकास आघाडी आणि डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. धारावी टी जंक्शनपासून निघालेला मोर्चा अदानींच्या कार्यावर धडकला. या मोर्चात उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेही सामील झाले होते.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

धारावीच्या टीडीआरसाठी सकरारने स्वत:ची कंपनी नेमून द्यावी. धारावीमधील सर्व निवासी आणि अनिवासी झोपडीधारकांना पात्र ठरवून धारावीतच त्यांचं पुनर्वसन करण्यात यावे, निवासी झोपडीधारकांनां ५०० चौरस फुटांपर्यंतचं घर मोफत द्यावं, महानगरपालिकेच्या मालमत्ता विभागाच्या धारावीत असलेल्या चाळी आणि बिल्डिंगमधील रहिवाशांना ७५० चौफुटांचं घर मोफत देण्यात यावं, अशा मागण्या आंदोलकांकडून करण्यात येत आहेत.

दरम्यान धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून संजय राऊत यांनीही अदानी समुहावर टीका केली होती. राऊत यांनी म्हटले होते की, धारावी पुनर्विकास प्रकल्प देशातील सर्वोत मोठा टीडीआर प्रकल्प आहे.  मात्र त्यात मोठा घोटाळा होताना दिसत आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवल्यासारखे आहे. धारावी हा पहिला घास आहे आणि  त्यानंतर मुंबई गिळण्याचे गुजराती लॉबीचे कारस्थान आहे. गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे, ते वेळीच रोखायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या