मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ST महामंडळाच्या निधीला सरकारकडून कात्री.. आता कुठं गेले खोत, पडळकर, अन् सदावर्ते? शिवसेनेचा सवाल

ST महामंडळाच्या निधीला सरकारकडून कात्री.. आता कुठं गेले खोत, पडळकर, अन् सदावर्ते? शिवसेनेचा सवाल

Sep 23, 2022, 05:45 PM IST

    • महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ३६० कोटी वेतनाचे अनुदान १०० कोटींवर आणून कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र या विषयावर कोणीही बोलायला तयार  नसल्याचा  आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केला आहे. 
ST महामंडळाच्या निधीला सरकारकडून कात्री..

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ३६० कोटी वेतनाचे अनुदान १०० कोटींवर आणून कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र याविषयावर कोणीही बोलायला तयार नसल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केला आहे.

    • महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ३६० कोटी वेतनाचे अनुदान १०० कोटींवर आणून कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र या विषयावर कोणीही बोलायला तयार  नसल्याचा  आरोप महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केला आहे. 

राज्यात नवरात्र उत्सव, दसरा व दिवाळीची धुमधाम सुरू असताना एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसटी कर्मचाऱ्याकडून दरवर्षी दिवाळीत आपल्या मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसतात. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी महाविकास आघाडी सरकारविरोधात एसटी कर्मचाऱ्यांची बाजू घेणारे सदाभाऊ खोत (sadabhau khot), गोपीचंद पडळकर व वकील गुणरत्न सदावर्ते (gunratna sadavarte) आता कुठे गेलेत?असा सवाल शिवसेनाप्रणित महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Lok Sabha Elections 2024: मुंबईत उद्या मतदान! काय बंद आणि काय राहणार सुरू? जाणून घ्या

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

महाविकास आघाडी सरकारविरोधात आक्रमक आंदोलन करणारे व शरद पवारांच्या निवासस्थानवर चाल करून गेलेले एसटी कर्मचारी आता शांत आहे. नव्याशिंदे-फडणवीस सरकारकडून एसटी महामंडळाच्या निधीला कात्री लावल्याचे सांगितले जातआहे. त्यामुळे ऐनदसरा-दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विजय मालोकार यांनीयावरून सरकारवर टीका केली आहे.महाविकास आघाडी सरकारच्या काळातील ३६० कोटी वेतनाचे अनुदान १०० कोटींवर आणून कर्मचाऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र याविषयावर कोणीही बोलायला तयार नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळात त्यांचा पुळका आणणारे सदाभाऊ खोत,गोपीचंद पडळकर, सदावर्ते आता कुठे गेलेत? एसटी कर्मचाऱ्यांच्या दरमहा पगारासाठी ३६० कोटी रूपये दिले जातील, असा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. आता शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या पगारासाठी फक्त १०० कोटी रुपये अनुदान दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या