मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sanjay Raut : कोणाचे १५ आमदार शिंदे गटात जाणार?; संजय राऊतांनीच सांगून टाकलं!

Sanjay Raut : कोणाचे १५ आमदार शिंदे गटात जाणार?; संजय राऊतांनीच सांगून टाकलं!

Feb 10, 2023, 12:24 PM IST

  • Sanjay Raut on Bachchu Kadu : १५ आमदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या बच्चू कडू यांच्या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut

Sanjay Raut on Bachchu Kadu : १५ आमदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या बच्चू कडू यांच्या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.

  • Sanjay Raut on Bachchu Kadu : १५ आमदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या बच्चू कडू यांच्या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut on Bachchu Kadu : राज्यात सत्तांतर झाल्यापासून सत्ताधारी व विरोधी नेत्यांकडून सातत्यानं काही ना काही दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिंदे-फडणवीस सरकार बेकायदा असून ते फार काळ टिकणार नाही, असा महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तर, सरकारला कसलाही धोका नाही, असं सत्ताधाऱ्यांचा विश्वास आहे. अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीही यापुढं जाऊन येत्या काही दिवसांत १५ ते २० आमदार शिंदे गटात येणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर आज प्रतिक्रिया दिली.

ट्रेंडिंग न्यूज

maharashtra heat stroke cases : महाराष्ट्रात ७४ दिवसांत उष्माघाताचे २४१ बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्यूंची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

‘राज्यातील सरकार स्थिर आहे. ते पडण्याचं काहीही कारण नाही. सरकारला अति बहुमत आहे. अगदी २०-२५ आमदार इकडे तिकडे झाले तरी, काही फरक पडणार नाही. उलट येत्या काही दिवसांत महाविकास आघाडीतलेच १५ ते २० आमदार भाजप, शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा बच्चू कडू यांनी नुकताच केला होता. 'पक्षांतर करणारे हे आमदार काँग्रेस व राष्ट्रवादीचे असतील, असंही ते म्हणाले होते.

याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता, ‘कोण काय बोलतं याकडं लक्ष देण्याची गरज नाही. बच्चू कडू हे स्वत: शिंदे गटात जाणार आहेत का,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. दुसऱ्याच क्षणी, ‘बच्चू कडू यांची माहिती बरोबर आहे. भाजपचे काही आमदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत अशी माझी माहिती आहे,’ असं संजय राऊत म्हणाले.

म्हणून मोदी वारंवार मुंबईत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरही संजय राऊत यांनी यावेळी टिप्पणी केली. 'वंदे भारत हे केवळ एक निमित्त आहे. नरेंद्र मोदी यांना मुंबई महापालिका जिंकायची आहे. त्यामुळंच ते वारंवार इथं येत आहेत. त्यांना वारंवार मुंबईत यावं लागणं म्हणजे भाजप आणि मिंधे गटाचे लोक नाकर्ते आहेत हेच सिद्ध होतं, असंही राऊत म्हणाले.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या